कांदाट खोर्यात उनाड भटकंती

      जून महिन्याच्या सुरुवातीलाच दमदार हजेरी लावून वरुणराजा कुठे दडी मारून बसला होता देव जाणे.  त्यामुळे आमची, म्हणजे ट्रेकर्स मंडळीची अडचण अशी झाली कि पावसाळी धोपट ट्रेक करावा कि कुठली अडनडी वाट धरावी. अवघड जागी नेमका पाऊस आला म्हणजे झाली का पंचाईत. हो-नाही, नंतर बघू, जाऊ दे, जाऊयात असं करत शेवटी ऑफिसला दांडी मारायचं ठरवून मी आणि मंडळीने ट्रेकचा प्लान मांडायला सुरुवात केली. ट्रेकसाठी बोट वर केलेल्यांमध्ये माझ्याबरोबर प्रिती, राजस, अमित, आशिष, सोनाली ह्यांचा नंबर लागला. हे सगळे कसलेले ट्रेकर असल्याने अडनडी काहीतरी प्रयत्न करायला काहीच हरकत नव्हती.

      नकाशे गिरवत असताना पर्वत आणि चकदेव पाशी आम्ही सगळेच घुटमळलो. बरीच वर्षे एकत्र ट्रेक करत असाल तर समोरच्याच्या डोक्यात काय प्लॅन शिंकू पाहतोय हे कळायला फारसा वेळ लागत नाही. साधारणपणे जी पाउलवाट आम्ही नकाशावर गिरवली तसा इतर पर्यायांचा विचार मागे राहिला आणि आमची चर्चा "नक्की जायचं ना, की पावसाळ्यानंतर करायचा" ह्या विचारांना बगल देऊन थेट "मुक्काम इथं करुयात" आणि "सगळ ठीक आहे पण जळवांचं काय ते पाहवं लागेल" इथवर आली. त्याचं काय ते पाहून घेऊ असं ठरवून आम्ही प्लॅन ठरवला. तो असा: शुक्रवारी हापिसातनं वेळेत निघून रात्री प्रवास सुरु करायचा आणि पहाटेपर्यंत दाभ्यात पोहोचायचं. तिथनं सकाळी लवकर निघून रात्री पर्वतगडला मुक्काम करायचा, दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास. हा ट्रेक तसा मोठा होता आणि म्हणून मुंबईपासूनचं अंतर लक्ष्यात घेता वेळेची आखणी करणं गरजेचं होतं. आमचं वेळापत्रक इंजिनियरिंगच्या वेळापत्राकाहून क्लिष्ट दिसत होतं.

      तिथं जेमतेम साडेतीन-चार महिन्यात सगळा अभ्यासक्रम (ऑप्शनला टाकायचं) शिकवतात आणि त्यात त्या रद्दीत टाकायला कामी येणाऱ्या फाईली छापायला लावतात. परीक्षा मात्र महिनाभर चालणार! वा रं गड्या, काय कारभार आहे. आमच्याही ट्रेकचं तसंच काहीसं होणार होतं. नाकापेक्ष्या मोती जड : चाय से ज्यादा किटली गरम :: ट्रेकपेक्ष्या प्रवास मोठा! त्यात मग तिथल्या वाहतूकीच्या पर्यायांची गैरसोय पाहता त्यावर अवलंबून न राहून आम्ही स्वतःची गाडी न्यायचं ठरवलं, इतर मंडळीनीही बिनविरोध होकार दिला.

      हापिसातनं निघून अंधेरीकडे जाण्याऱ्या आणि ट्राफिकमध्ये अडकलेल्या रिक्षांना धावत मागं टाकत मेट्रो गाठली. मग घाटकोपरहून धावत-पळत-लोंबकळत पकडलेली लोकल सेमीफास्ट निघावी, मग अशक्य चिडचिड. तसंच घरी आल्यावर वाया गेलेल्या वेळेची भरपाई म्हणून गडबडीत सगळं सामान प्लास्टिकच्या पिशवीत (दोनदा, महत्त्वाचं सामान तिनदा) गुंडाळून कसंतरी ब्यागेत कोंबलं आणि मुलुंड गाठलं. स्टेशनवरच आशिष भेटला, बाकी सगळ्यांनी प्रितीच्या घरी हजेरी आधीच लावली होती.

      ठरल्याप्रमाणे ६ लोक अन ८ ब्यागा गाडीत डांबून ११ च्या ऐवजी १२ वाजता गाडी कोकणाकडे निघाली. वडखळ नाक्यापाशी सारथींसोबत चहा पोटात ढकलून, जुन्या ट्रेकच्या आठवणीत रमून प्रवास चालू होता. पोलादपूर पासून राजस आणि मी जागं राहाणं गरजेचं होतं कारण ते आतले रस्ते मला आणि त्यालाच माहित होते. तरी मी डुलक्या घेतच होतो. पारगाव फाट्यापासून मात्र मी जागं राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतो, आणि काही अंशी ते झालंच. राजस बिचारा खूप वेळ जागा असल्यानं झोपेला आला होता. मग तो झोपला तसा सकाळ झाली आणि आम्ही जवळपास पोहोचलोच होतो. शेवटी ७ वाजता आम्ही एकदाचे दाभे गावात पोहोचलो. मी लगेच बाजूला ठेवलेली सॅक मांडीवर घेतली, गाडीचं दार उघडलं आणि बाहेर पाऊस. ततःक्षणी मी दार लोटून घेतलं आणि मुटकुळं करून झोपी गेलो. सगळेच झोपले होते.

      मला जाग आली तेव्हा सोनालीनं य-वेळा उघडून परत चेन लावून ठेवलेली तिची सॅक पाठीशी मारून ती आता वैतागून गाडीबाहेर उतरली. मग निर्लज्जपणे तिलाच वेळ विचारली आणि तिने ९ वाजले असं सांगितल्यावर माझी झोप पार उडून गेली. मग सॅक घेऊन भराभरा बाहेर आल्यावर एका मामांशी वाटेबद्दल चर्चा केली. मग जरा नवीन म्हणून प्लॅनमध्ये हलकासा बदल केला. झोपा काढण्यात वाया गेलेला (किंवा सत्कारणी लागलेला) वेळ भरून काढायचा म्हणून आम्ही रेणोशीतून जायचं ठरवलं. पुन्हा गाडीत बसायचं म्हणाल्यावर सोनालीचा चेहरा कसा झाला होता ते कायम लक्षात राहील.

      दाभे ते रेणोशी जास्त लांब नसल्यानं जास्त वेळ गेला नाही. रेणोशीत पुन्हा एकदा वाटेची चौकशी केली आणि देखण्या अश्या त्या मंदिरासमोरून समोरच्या शेतापलीकडे असलेल्या सोंडेवर चढाई सुरु केली. अगदी सुसह्य असा रिमझिम पाऊस चालू झाला होता. ह्या भागात आतापर्यंत बर्यापैकी पाऊस झाल्यानं सगळीकडे हिरवे गालिचे दिसत होते. भातशेतीची कामं जोरदार चालू होती. मामांनी सांगितल्याप्रमाणे पुन्हा गाडीरस्ता लागल्यावर असलेल्या झापाकडे वळलो आणि मग एकदा वाटेची खात्री करून पुढील चढाई सुरु केली. साधारण १० मिनिटात एका माळावर आलो, आणि वाट भातशेतामध्ये हरवली. मग थोडं डोकं खाजवून योग्य दिशेचा अंदाज घेतला, कुठे जायचंय त्याचा अंदाज घेतला आणि एका थोड्या अडचणीच्या वाटेवर चढायला सुरुवात केली. मी पुढे, वर जाउन वाट असल्याची खात्री केली, वाट बर्यापैकी मोडलीच होती पण जाण्यायोग्य होती, काही अडचणीच्या ठिकाणी, काट्याच्या झुडुपाला गुरासारखं इथं-तिथं वळसा घालून एकमेकांना मदत करत आम्ही वरच्या पठारावर पोहोचलो. इथून पुढे मळलेली वाट लागली. पाऊस सतत चालू होता त्यामुळे काही थकवा जाणवला नाही. मिळालेली लय तोडायची नाही म्हणून तसंच पुढे चढाई चालू ठेवली. अर्धा चढ चढल्यावर रूळ्यातून आलेली वाट येउन मिळते. रुळ्यातनं आलेली वाट सोबत एक पाण्याचा पाईप घेऊन येते, त्यामुळे वाट तशी प्रशस्त आणि ठळक आहे, आणि त्यामुळे साहजिकच वस्ती जवळ असल्याचं एक लक्षण आहे. चढ संपला की इथं एक धनगरवाडा लागतो, लामजमुरा. 12 वाजले असल्यानं आता पोटात कावळे ओरडत होते म्हणून आम्ही त्या वस्तीत सोबत आणलेला खाऊ खाऊन, ताक पिऊन उचाटची वाट धरली. इतर धनगरपाड्याच्या तुलनेत इथं बरीच वस्ती आहे. कच्चा रस्ता तुडवात आम्ही खिंड पार केली. तिथंच शाळेपाशी डाव्या हाताला वळून खाली उतरायला सुरुवात केली तेव्हा 1.30 वाजले होते.

      इथून पुढे 2 वाटा खाली उतरतात, एक लमाज गावात तर दूसरी वाघवळे गावात. त्यातली वाघवळे ची वाट सोपी आणि पर्वतगडाकडे जाण्यास सोईस्कर आहे. साधारणतः तासाभरात आम्ही वाघवळे गावात पोहोचलो. वाघवळेला उतरत असताना समोरच पर्वतगड छाती काढून उभा असलेला दिसत होता. दुपारचे 3 वाजले होते. आमचा गाडीवाला ठरल्याप्रमाणं उचाटला गाडी घेऊन येणं अपेक्षित होतं.  वाघवळेहून उचाटला पायी चालत साधारण 10 मिनिटं लागतात. तो तिथं आला असेल असं मानून आम्ही उचाट गावाकडं निघालो. ठरल्याजागी तो न भेटल्यानं आम्ही गावात चौकशी केली असता असं कळलं की गावात अशी कोणती गाडी आलीच नाही. त्यात इथं नेटवर्क नाही. तरी तो नेटवर्क असलेल्या जागी असेल अशी आशा करून आम्ही गावातल्या एका घरातून लँडलाईन फोन वरून त्याला कॉल केला, आणि सुदैवानं त्यानं उचलला.

दादा: गाडी येत नाही हो तिथं, फिरून यावं लागेल, 150 किमी, वेळ जाईल.
राजस: तू कुठे आहेस?
दादा: आहिर गावात. गाडी अडकली होती, कसबसा निघालो आणि परत आलोय.

      मग त्याला तिथेच थांबायला सांगून आम्ही पुन्हा चर्चा केली आणि ट्रेकचा प्लॅन बदलला. मुक्कामासाठी सर्व सामान असलं तरीही आम्ही पर्वतला न जाता साळोशीत मुक्काम करून दुसऱ्या दिवशी तिथून दाभ्यात जाता येईल असा विचार केला कारण इतक्या उशीरा पर्वतगडावर मुक्कामासाठी जाणं तसं अवघड होतं, त्यात गाडीवाल्याला शिंदीचा रस्ता समजेल की नाही त्यात शंका होती. मग त्याला पुन्हा फोन करून दाभ्यात राहायला सांगून आम्ही साळोशीकडे निघालो. उचाट ते साळोशी अंतर 3 किमी आहे, त्यामुळे काही विशेष वाटलं नाही.

      साळोशीत अतिशय प्रेमळ अशा शेलार आजोबांच्या घरी आमच्या राहण्याची सोय झाली, जेवणही तिथेच. रात्रभर पाऊस कोसळत होता. पहाटे कुठे त्यानं जरा विश्रांती घेतली. सकाळी आम्ही निघायची वेळ आणि पाऊसाने परत येण्यास गाठ पडली. दिवसाचा कार्यक्रम असा होता की साळोशीतून निघून झडणी मार्गे दाभे गाठायचं. परतीच्या प्रवासाचा विचार केला असता हा पल्ला तसा लांबचा होता, पण आम्ही करू अशी खात्री होती कारण प्रिती आणि राजसने ही वाट केली होती. पटकन खादाडी उरकून, वाटेबद्दल थोडी चर्चा करून आम्ही 8.30 वाजता साळोशी सोडलं. पावसाची रिपरिप चालू असल्यानं चढ तसा जास्त जाणवत नव्हता, सोबतीला वारा आणि मागं कांदाटचं खोरं. ह्याहून आणिक काय हवंय ट्रेक करताना. मानवी हस्तक्षेपाचा  लवलेशही नसावा असं ते रान. कोयनेच्या पाण्यापासून कांदाटीला विभागणार्या पर्वतरांगेवर झडणीचा पाडा आहे. साधारणतः 2 तास विशेष घाई-गडबड-धावपळ न करता आम्ही झडणीत पोहोचलो. झडणीत प्रमुख वस्ती आहे ती गवळी समाजाची, त्यामुळे दही-ताक ह्यांची चंगळ! दोन-दोन वाट्या दह्यावर ताव मारून आम्ही गावापलीकडे असलेल्या धारेवर चढाई सुरु केली. थोडाफार थकवा जाणवत होता, आणि ते स्वाभाविक होतं. तसंच दम काढत जेमतेम 20 मिनिटे चढ चढल्यावर उजवीकडून एक वाट वर येताना दिसली.

गवळी मामा (श्री. बरगे) : आमी लोणी न्येतो महाबलेश्वरला तवा हिथुन खाली खरोशीत जातो अन तिथनं येष्टी मिलती.
तिथं आम्ही अजुन एकदा चर्चा केली की इथून पुढे 3 तास चालत दाभे गाठयचं की खाली खरोशीत उतरून पुढे जे मिळेल त्यानं दाभ्यात जायचं?
मामांच्या मते खरोशीत जाणं सोईचं होतं. मग आम्हीही वेळेची आकडेमोड करून खरोशीत जायचा निर्णय घेतला. कड्याला उजव्या कडेकडेने वळसा घालत वाट खाली उतरत होती. वाटेत जळवा होत्या म्हणून विशेष वेळ न घालवता आम्ही पटापट उतरत गेलो, तरी जळवांशी युद्ध चालूच होतं. समोर कोयनेचं पाणी आणि त्यापल्याड महाबळेश्वरच्या ईशान्येकडंचा भाग डोळ्याचं पारणं फिटेल असं दृश्य रंगवू पाहत होता, पावसाने विश्रांती घेऊन उघडीप दिल्यानं त दृश्ये आणखीच लोभस झालं. मग तसं आम्हीही पळापळी बंद करून त्यास योग्य ती दाद दिली आणि आनंद लुटला. दुपारी 2 च्या सुमारास आम्ही खरोशीत पोहोचलो.

      आता इथं नेटवर्क नसल्यानं गाडी बोलवायची कशी हा प्रश्न होता. त्या रस्त्याला वाहतूक तशी अगदीच कमी. 10 मिनिटं आराम करून मी आणि सोनाली दाभ्याकडे पायी निघालो. सर्वांची दांडी यात्रा होण्यापेक्ष्या मी आणि सोनालीनं ते अंतर जमेल तसं कापायचं आणि गाडी पाठवायची असं मीच ठरवलं. वर्षात 4 महीने हिमालयात घालवणाऱ्या सोनालीला त्यात काही वावगं वाटलं नाही. गप्पा मारत आम्ही 7 किमी कधी चाललो ते कळलंच नाही. आम्ही पोहोचून गाडी परत पाठवूपर्यंत बाकी मंडळीही बरंच अंतर चालत आली होती.

      कोरडे होऊन, आवरून, थोडा खाऊ खाऊन आम्ही 4.30 ला दाभे सोडलं. प्रतापगडाजवळ जेवण उरकून आम्ही डुलक्या काढत, गप्पा मारत 11 ला मुलुंडला पोहोचलो. अगदी अखलेल्या प्लॅननुसार नाही पण ट्रेक नक्कीच खूप मजेशीर झाला होता. हिलाच पावसाळी उनाड भटकंती म्हणतात का हो? साहजिकच ह्याप्रकारच्या भटकंतीला तिथंला भूगोल पाठ हवाच आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे तसा अनुभवी आणि तंदुरूस्त चमू हवा.

गाडा

पावसापासून वाचवण्यासाठी पॅकेट बॅगेत ठेवून झीप (बॅगेची) लावून "कांजूर 15, कांजूर 15" अशी आरोळी ठोकत असलेल्या बसकड धूम ठोकली, मोबाईल काही हातातून सोडवेना.
बसमध्ये धक्के खात, स्वतः पेक्ष्या मोबाईलला जास्त जपत प्रवास सुरु झाला. वाटेत एक शाळा आहे, तिथं पण गर्दी, हॉर्न वाजवू नका वगैरे वगैरे तत्सम सुचनांकडे सपशेल दुर्लक्ष्य करत रॅट-रेस चालूच होती. जवळ 1000 रुपये आहेत म्हणल्यावर आज फ्लोटर घेता येईल, अरे मग कोणती घ्यायची असल्या फालतू विचारात मी गर्क होतो. तितक्यातच माझं लक्ष्य एका पोराकडे गेलं. ते कारटं गळ्यातला टाय ढीला करून मैदानात साचलेल्या पाण्याकडं धावत सुटलं होतं, दूरवर त्याची सॅक घेऊन हताशपणे त्याकडं पाहणारी त्याची आई! ते पाहून लहानपण नाही आठवलं तर नवल!

मग मी थेट शाळेतल्या पंदेरे बाईंच्या तासात पोहोचलो. मला आजवर झोडणार्यांमध्ये पावसापाठोपाठ ह्या बाईंचा नंबर लागेल. अर्थातच मी काही कमी छळीक नव्हतो. स्वप्निल काळेच्या डुक्कर मुसंड्या काय आणि अवधूत चाळकेला सतरंजीत गुंडाळून मारणे काय किंवा तेजल गायकवाडला दंडावर चावणे असो, ह्या निरागस कृत्यांपासून ते थेट रहाणेसोबत साजरा केलेला सेंड-ऑफ़ इथवरचा प्रवास फार मोठा होता. ती सकाळी उठायच्या गडबड, मग तोंडात ब्रश ठेवून काढलेली डुलकी, त्यावर आईने ओरडून सांगणे "पश्या पाणी काढलयं!".. माझे केस कधी विंचरले गेलेच नाहीत..ते स्लीपर पायात ढकलून शाळेत पळणं, मग वर्गात जाऊन स्वप्निल काळे, निशांत समेळ आणि आदित्य कल्लोळकरच्या मधली जागा पकडणे, ते डोक्यावरून जाणारं गणित, चाकाचा शोध नी ती अणकुचिदार हत्यारं आणि काय काय. मधल्या सुट्टीत मटकीची उसळ, खान्देशी लोणच्याच्या बदल्यात काळेने दाण्याच्या कुटाच्या चटणीवर मारलेला ताव, काल रात्री सिनेमात अक्षय कुमारने दिलिप ताहिल किंवा मोहन जोशीला मारलेली किक हा गाशा गुंडाळून उरल्या वेळेत चोर-पोलिस खेळणं, किंवा नजर चूकवून पुलावरून रेल्वे पाहणे काय, मग त्यात 2 लोकल ऐवजी एक एक्सप्रेस दिसली तर मग चांदीच चांदी. ह्या एका कारणास्तव उद्यान आणि कोयना आमच्यासाठी जगात भारी गाडया होत्या. मस्ती एवढी होती की झोपेचा प्रश्नच आला नाही, मग ते रांगेत सू ला जाणे काय, 100 पानी वही विमानात इन्वेस्ट करणे काय, मग कधी त्याचं रॉकेट तर कधी हळू उडणारे Cessena काय.

प्रोमोशन-डिमोशन तिथेही होतंच की: सतरंजी ते बाक, 100 पानी वह्या ते 200 पानी वह्या, चोर-पोलिस ते खो-खो, नाईलाजनं स्वप्निल काळे ऐवजी बेंचमेट म्हणून मानसी करमरकर येणं काय, अभ्यासात तसा मी कच्चाच. मग त्या चाफेकर बाईंच्या तासाला वर्गाबाहेर उभे राहणे काय, तिथं उभारून बाहेरचा पाऊस पाहणे काय. मग हळूहळू अभ्यास वाढत गेला, मित्रही वाढले. आज मोबाईल मध्ये असलेल्या क्रिकबझवर स्कोअर पाहण्यापेक्षा TV वाल्या दुकानात स्कोअर पाहण्यात जास्त मजा होती.
बसमध्ये ड्रायवर काकांच्या मागच्या सिटवर उलटे गूढघ्यावर बसून समोरचं पाहण्याची सर धावत पकडलेल्या लोकल मधल्या सीट ला कधी यावी! कसंय ना, तेव्हा खिशात दमडी नसायची तरी आपण दुनियेला फाट्यावर मारायचो आणि आज म्हणे आपण दुनियादारीत अडकलो आहोत. नाही, चूक. तेव्हाही दुनियादारी होती च. फक्त ते वजन आपल्या आई-बाबांनी अलगद पेलून धरलं होतं.. आता जेव्हा काही नगण्य अंशी ते आपण पेलत आहोत, तर आपल्याला जुने दिवस आठवत आहेत.

हल्ली खूप लोक दिसले असं शाळेतले दिवस आठवून गिरवणारे. माझा मुद्दा हा नाहीये की माझं शालेय जीवन काय भारी होतं आणि आता मुलांचं कसं कमी मजेचं आहे.

Change is the only constant! आता आयुष्य अपग्रेड करून सोपं करण्याच्या नादात आपण जर त्यातली सिंप्लिसिटी हरपत असू तर ती आपली चूक. पाऊस तर आजही पडतोय, मैदानात पाणी आज ही सचतं, कागदाच्या होड्या-विमानं आजही बनू शकतात.. आपणच बदललोय.



The Unsocial

The guy was riding on his old hawk to the workplace which is about 6 miles. The way people ride and drive in this city is renowned for its haphazard notoriousness.

The guy had worn his regular outfit that usually is barring the dress-code rules in the company he worked for. The guy had headsets on, that didn't cost him much. The typical tech-factory CDAC emblem on his shirt, the MNC-Badge hanging to the waist buckle, and no wrist watch was only emphasizing that he works for a good company and on a computer, and probably as a developer. Developers have already got so many virtual leaches to piss them off.

Though the bicycle was old enough to trash, the guy had religiously loved it for it being his first road-bike ever. If you are in a good physical shape, a bicycle can really be less irritating to ride than a bike in the rush hours of day, simply you being clearly out of the rat race in the traffic.

The guy wasn't a too good a rider at all, occasionally, he would just set off to his home roughly 90 miles away on this bicycle just because he wants to. Traffic does annoy anyone, the guy wasn't an exception. Though he would normally manage to sneak out of the rabble at the traffic signals, desperates honking at the red light, sometimes, very rarely someone, more often an educated illiterate would get to bear his tough looks, or worst case a wrath of bad words for dashing derailleur on his bicycle.

The guy would nod in complete despair and speak to himself, "Didn't they go to school where they teach a Red light is a Stop and a Green is a Go? Honking at the people up front waiting the light to turn Green, doesn't change the light to Green, or does it?"
There are so many situations wherein a Cyclist has given lesser priority over even a pedestrian.

One morning when the guy was riding easy on a reserved bicycle track, came across a fat lady strolling right in the middle of the track. The guy rang the bell so that she gives him a way. But the fat lady had other ideas.

(Translated):
The Fat Lady, "Whats the hurry about? Can't you see I am walking? Is it not now up to us (older citizen she meant, though she didn't look any older than mid-40s) whre to walk?"
The guy tried to explain, "But aunt, this.. <interrupted>.. listen.. <interrupted>.."
Now, that Fat lady would talk a bit louder, such that the guy needed to take his headsets off.

The scene was a good recipe for other older-fitness-enthusiasts to gather around, like the guy had hit the fat lady.

The guy looked at the mob pitifully, grinned and took a stance to explain.
The guy didn't speak much, just pointed at the board that has a Bicycle symbol drawn on it and said, 

"The school where I went in, and the books that my parents made me read when I was a kid, they all taught me with this picture and words 'bicycle' written below it. Hope you all had chance to go to one such basic schooling facility and read similar books. Did it never occur to you all that why would a corporation have pavement reserved to walk and a track reserved for Bicycles only(waving the two fingers to emphasize) where we are standing right now? You guys are mature and old, behave like you are!"

The mob made way for the guy to go, the fat lady was never seen next morning or ever after. The guy would though feel bad for the Fat lady and thought, Why are we so much into the victimized state of mind? We all have handful of things to whine about.

Some other day later, the guy was riding his way to a movie theater. A reputed movie theater can either be a good bird-watching place or can be a place where the crowd tries to behave well and not turn into a rabble, possibly not out of conscience, but out of shame. The crowd we call as public. The guy was never a block to fit in such a crowd, though he would make sure that he has his mind focused on what he is there for, and not on what he should complain about and get irritated by.

The guy and his friends who rode their way to the theater finally bumped into the seats. There was a group of girls, typical college group that he discovered later, who came and took the seats next to guys. These days a few of the theaters follow a thing that after a few minutes of relatively tolerable jewelry ads and health advice, they play our national anthem, which to me is perfectly alright and good-to-have thing. Just when the instructions to stand up in respect were flashed on screen, one of the girls exclaimed, <Translated>

"See, that's why I was asking all of you not to hurry to screen and we had enough time to get us coke and some more chips."

The other girl in total agreement and disappointment said, 

"Yeah, makes sense. I forgot that they play this thing at the beginning, damn, we shouldn't have hurried and instead could have got chips and coke, now we have to wait till the interval."

In the mean time when they were whining about it, the anthem was over and people were taking their seats.

The guy, again in complete despair bumped into the seat and thought, Why are we so irritated to stand for our national anthem and/or being ashamed of doing so? And, then we expect ourselves staying in a better country than our very own. Its not India who made us what we are, its us who make India what it is. The guy grinned again, took a sip of a western beverage, suppressed his thoughts and was lost in the mob..


निसणीची वाट - लिंग्या घाट - देव घाट

      पंधरा दिवसांपूर्वी झालेला ऊन्हाळ्यातला पावसाळी ट्रेक म्हणजे आधीच थंडीनं थरथर कापणारे हात, त्यात हे "धामणओहोळ" ज्याचा लोकांनी "धामणहोळ" किंवा "धामणवहाळ" असा अपभ्रंश केला आहे, त्याचं कोडं ह्या ब्लॉगमध्ये नेमकं खरडवणं म्हणजे खरंच अवघड काम आहे. असो, हाती घेतलं तर तसं अवघड नाही. त्याला नेमकी सुरुवात कुठून आणि कशी करू हे कोडं काही सुटत नाही, आणि त्याच विचारात  बघता-बघता कधी मी त्या टुमदार आणि देखण्या गावात जाऊन पोहोचतो ह्याचा पत्ता लागत नाही, टेबलावर ठेवलेली कॉफी गळाभेटीसाठी ताटकळत राहून गार पडते.

      ह्या सगळ्या प्रकरणात प्रमुख कलाकार आहेत धामणओहोळ गावातले शेडगे आणि काळे कुटुंबीय आणि मग आपला चमू: रोहन, सागर, मनोज, प्रिती, राजस, यज्ञेश, पवन आणि मी.

      पुण्याच्या दक्षिण-पश्चिमेला, (एका) मानवाने निसर्गाची केलेली हेळसांड ज्याला लोकं "लवासा टाऊनशिप" म्हणतात, त्याच्या पलीकडे साधारण १६ किलोमीटरवर धामणओहोळ आहे. बहुतांश जागा बड्या-धेंड्यांना विकल्या गेल्या असल्या तरीही लवासा प्रकल्पावर स्टे आणून पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील अशा ६६ गावांची जी यादी केली गेली आहे, त्यात धामणओहोळची वर्णी लागली आहे.
      असो, माझी आणि धामणओहोळची ओळख आहे ती फक्त घाट-वाटांमुळे. त्यापैकी मी एकच वाट केली होती, ज्याला मी लिंग्याघाट समजत होतो. ती वाट तशी ट्रेकर्सच्या ऐकण्यात-माहितीत असलेली, आणि देवघाट तसा ब-यांपैकी अनोळखी.

भाग १:

      मी, मनोज, रोहन, सागर आणि प्रिती ह्या वाटा करण्याच्या हेतूने धामणओहोळला पोहोचलो. “मी याआधी केलेली वाट नक्की लिंग्याघाटाची होती का?” ह्यातल्या प्रश्नचिन्हाचं उत्तर हे ह्या एकूण कोड्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. गावात विचारपूस केल्यावर आणखीकाही नावं कानावर पडली: निसणीची वाट आणि चिपाचं दार. मग मात्र आम्ही ख-या अर्थानं मामांच्या मागे प्रश्नाची सरबत्ती मांडली. ह्यातनं भरपूर अशा गोष्टी कळल्या किजिथं पाळंदे सरांच्या पुस्तकातल्या काही डीटेल्स, काही ब्लॉग्स आणि गावक-यांनी सांगितलेली माहिती ह्यात तफावत आढळली. मग (स्व-समाधानासाठी) त्याची शहानिशा करण्यासाठी आम्ही हा आणि ह्या पुढचा वीकेंड पण बूक करून टाकला. एका खेपेला २-२ वाटा केल्या तर इथल्या चारही वाटा होणार होत्या. चिपाचं दार पुढच्या खेपेसाठी ठेऊन आम्ही आधी देवघाट (जो खरंतर लिंग्याघाट आहे असा खुलासा आम्हाला ट्रेक करून गावात परतल्यावर झाला) आणि निसणीची वाट (जिला मी लिंग्या घाट समजत होतो) हा कार्यक्रम उरकायचं ठरवलं.

      मामांशी बरीच चर्चा करून झाल्यावर मी सुध्दा बुचकळ्यात पडला होतो की मी नेमकं कोणत्या वाटेत जोडं झिजवलंय. हा, आता “कोणती पण वाट चढलो असू, त्यात काय एवढं” असा प्रकार ज्यांचा असेल, हे कोडं त्यांच्यासाठी तर नक्कीच नाहीये, नाकाच्या शेंड्यावर राग येउन अगदी काढता पाय घेतला तरी चालेल. मग शेवटी आम्ही मामांना आम्हाला लिंग्याघाटाच्या तोंडाशी सोडायला भाग पाडलं. लांबवर दिसणार्या एका टॉवरकडे बोट दाखवत मी मामांना म्हणालो की मी तिथून वर आलो होतो. तीच निसणीची वाट आहे असं मामांनी पुन्हा एकदा सांगितलं. घाट उतरायला सुरुवात होते अगदी तिथेच वाघजाई देवीचं छोटं मंदिरवजा स्थान सुद्धा आहे.

      मग त्यांच्या मते देवघाट कोणता ह्या प्रश्नाला उत्तर म्हणून मामांनी आम्हाला तिथून जवळचं असलेल्या एका नाळेच्या तोंडाशी आणून उभं केलं. मामांचा निरोप घेऊन आम्ही त्या वाटेनं खाली उतरायला सुरुवातकेली. दगड रचून बनवलेलीटिपिकल वाट, एखाद्या घाटवाटेला साजेशी अशी ही वाट. अगदी मधोमध उभ्या असलेल्या सुळक्यापासून अजून खाली उतरून गेल्यावर उजव्या हाताला एक भली-मोठी नैसर्गिक गुहा दिसली. अत्यंत देखणी अशी जागा. आपोआप वाट सोडून पाय गुहेकडे वळाले हे सांगायला नको. गुहेच्या पोटाशी मातीत प्राण्यांच्या पायाचे ठसे दिसले, पण आवडअसली तरीही अज्ञानापोटी ते नीट ओळखता आले नाहीत. जमेल तेवढे फोटो काढून, पोटाचे थोडे चोचले पुरवून, द्राक्ष अक्षरशः गिळून मुखशुद्धी केली आणि आम्ही तिथून काढता पाय घेतला. गुहेनंतर नळी उतरत असताना अचानक वाट नाहीशी झाली. तिथून धबधब्याच्या वाटेनं थोडं खाली उतरल्यावर अचानक मोठा टप्पा दिसला. मग थोडी शोधाशोध केल्यावर वरच्या झाडीत वाट मिळाली. तिच्याने आम्ही पुढे गेलो आणि ओढा/नाळ खाली उजवीकडे राहून गेली. त्याच वाटेने जंगल तुडवत आम्ही एका फाट्याशी आलो.

“ही डावीकडची वाट वर त्या टॉवरपाशी जाते, मी ह्याच वाटेने वर गेलोय आधी. उजवीकडे कुर्डूगड.", असं म्हणून मी छानसा दगड पाहून त्यावर बसकण मारली.

      आमच्यापैकी फक्त मी आणि प्रितीने कुर्डूगड केला असल्याने कुर्डुगड पहायचं ठरलं. गेल्या खेपेला वेळेअभावी मी निव्वळ भोज्जा करून आलो होतो, मात्र ह्यावेळेस कुर्डूगड एकदा नीट पहायची संधी आयती चालून आली होती. हा किल्ला मा वळ खोर्याचे वतनदार श्री. बाजी पासलकर ह्यांच्या देखरेखीखाली होता. ही गोष्ट मला तोंडपाठ आहे असं मी म्हणत नाहीये पण धामणओहोळ गावातल्या किती पोरांना हे माहित असेल देव जाणे. कदाचित त्यांना हे ही माहित नसेल कि वरसगाव धरणाच्या जलाशयाला बाजीपासलकरांचं नाव का दिलं गेलं. जलाशयाला नाव दिलं गेलं पण दुर्दैवाने त्यांचा जुना वाडा आणि जमीन त्याच पाण्याखाली बुडाली आहे.

      मग ठरल्याप्रमाणे आम्ही कुर्डूगड पाहुन किल्ल्यावरच जेवणाचा कार्यक्रम उरकला, आणि कुर्डाई देवीच्या मंदिरापासून ११ नंबरच्या बसने पुन्हा त्याच फाट्यापाशी आलो. सुर्य आग ओकत असल्याने गाडीचं रेडीएटर मजबूत तापलं होतं, मग गटागट पाणी पिउन ते गार केलं आणि हाश-हुश करत करत थोडा वेळ आराम केला. सुमारे अर्धा तास अळ्ळम-टळ्ळम केल्यावर मग पुन्हा तिथून चालते झालो. अगदी ठळक, नियमित वापरातली आणिकमी-अधिक चढणीची ही वाट.

      कुर्डूपेठेतून घाटमाथ्यावर येण्यासाठी जेमतेम पाउण- एक तास लागतो. वाटेत एका अवघड ठिकाणी लाकडाचे वासे बसवून पाय ठेवायला जागा केली आहे तर काही ठिकाणी दगड रचूनपाय-या  केल्या आहेत. ही वाट चढुन आम्ही धामणओहोळला पोहोचलो. ह्याच वाटेला गावकरी निसणीची वाट म्हणतात.

      गावात परतल्यावर झालेल्या चर्चेपासून ह्या कोड्याला खरी सुरुवात झाली.  "आम्ही देवघाटानं खाली गेलो" असं ऐकल्याक्षणी आम्हाला गावातल्या काही जाणकार मंडळींनी ते शक्य नसल्याचा टोला हाणला. त्यांच्याशी बरीच चर्चा केल्यावर आम्हाला मामांनी केलेली लबाडी कळली. मामांनी आम्हाला सकाळी देवघाटाऐवजी लिंग्याघाटाच्या तोंडाशी सोडलं होतं. मग आमच्या ज्ञानात भर पडली कि  नाळेत थोडं खाली उतरल्यावर एक जेमतेम २०-२५ फुटाचा सुळका दिसतो, त्याला अनुसरून त्या वाटेला लिंग्याघाट असं नाव पडलं. मुद्दा निघालाच होता म्हणून हातासरशी त्यांनी आम्हाला देवघाटाचा अप्रोच कुठून आहे ते सांगितलं.

“निसणीची वाट म्हणजेच देवघाट का हो?” तर ह्याचं सरळसोट उत्तर “नाही” असं आहे. त्याचं आकलन आम्हाला दुस-या खेपेला झालं!

भाग २:

      ह्या खेपेला मात्र सगळे सोबती वेगळे होते. यज्ञेश, राजस, पवन, प्रिती आणि पाऊस. ह्यातल्या सगळ्यात जास्त त्रासदायक ठरू शकणा-यांमध्ये पावसाचा नंबर सगळ्यात वर. पवन आणि मी शनिवार दुपार पासूनच धामणओहोळात ठाण मांडुन बसलो होतो. आम्ही पुन्हा मामांना गाठलं.

“मामा, ह्यावेळेस देवघाटानं खाली जायचं”, मी पिल्लु सोडलं.
मामांनी आधी बाहेर पावसाकडे नजर फिरवली आणि मग पु. लं. च्या “मुंबईकर-पुणेकर-नागपूरकर”मध्ये “पुण्यातल्या दुकानात गि-हाईक कसा दुय्यम असतो” ह्याचं जसं वर्णन आहे अगदी तसं दुर्लक्ष करून ब-याच वेळानंतर आमच्याकडे करड्या नजरेनं पाहिलं.
“नाही जमायचं. कोण बी जात नाही तिथं. लय आधी गुरं लावाया जायचं, आता ते बी नाही. लय आधी त्या तिथं चौर्यापाशी उंबर्डीतनं गावातलं मानुस गुरं वर आणायचं आता ते बी न्हाई येत”, मामांचा सपशेल नकार. म्हातार्यानं तंबाखू मळून चुरा करावा अगदी तसं आमच्या कार्यक्रमावर पाणी सोडलं गेलं होतं.

      तरी आम्ही काही माघार घेतली नाही, नेटाने खोदून-खोदून माहिती विचारली. त्या दरम्यान देवघाटाची वाट किती अवघड आणि त्याहून किती माजलेली आहे ह्याचं कीर्तन आमच्यासमोर गायलं गेलं. पावसामुळे शेतीची कामं अडकून पडल्याने गावातली बरीच पुरुष मंडळी जमली. ते एकाच स्वरात सांगत होते की त्या वाटेनं उंबर्डीपर्यंत आजवर एकही व्यक्ती गेली नाहीये गेल्या ३५-४० वर्षांत, खुद्द मामाही नाही. माजलेलं गवत, मोडलेली वाट, नाकावरचा ऊतार, आणि त्यात हा अवकाळी पाऊस.

      दुपार आम्ही आसपासची मंदिरं, विहिरी पाहण्यात आणि वॉचटॉवरवर बसून घालवणं पसंत केलं. शांत गाणी (अर्थातच, कानात हेडफोन टाकून) ऐकत तिथं किंवा अशाच कुण्या आडगावी घालवलेली दुपार ही खोलीत भर्र पंख्याखाली लोळत घालवलेल्या आळशी दुपारीपेक्षा खूपच जास्त सुखदायी ठरते. त्यातलं गाणं ही अर्थातच सेकंडरी गोष्ट. सेकंडरी म्हणजेच दुय्यम असं म्हणायला हरकत नाही. पण इथं दुय्यम जरा सावत्र पोराला वापरावा तसा शब्द वाटतो.

When everything has come and gone, We'll look back on this road we're on.
Yeah, we'll see how far we've come.
Yeah, we've come a long way.
Let's not talk about the future, Let's not talk about the days gone past.
All this time we've been running round in circles, yeah.
Well, I can feel a change a coming, And I know we're gonna make it last.
From now on we'll be going somewhere slowly, instead of going nowhere fast.

- Bryan Adams. Track: Nowhere Fast, Album: Room Service.

      संध्याकाळी पावसामुळे गावाबाहेर फेरफटका मारता आला नाही आणि नाईलाजानं पायाची भिंगरी काळेंच्या व्हरांड्यात अडखळली. मस्त गप्पा रंगल्या. दिवेलागणीची वेळ झाली आणि जवळ-जवळ रिकामी झाल्यावर खळखळ वाजणा-या काडेपेटीतून कशा चार-पाच काड्या निघतात, तशी ती स्वारगेटहून ३.३० ला निघालेली धामणओहोळची एस.टी. आली आणि बसमधून इन-मीन-तीन डोकी उतरली. दिवसात ही स्वारगेटहून इथं येणारी एकमेव एस.टी. ही मुक्कामी येउन पहाटे ५. ४५ ला निघते.

      रात्री झोपण्याआधी एस. टी. चालक आणि वाहक काका, नथु काळे मामा आणि आमच्या पुन्हा गप्पा रंगल्या. साधे डिझेलचे पण पैसे निघत नसताना नुकसान सोसून ह्या आणि खरंतर ह्याहून अधिक आडगावात सेवा अविरत चालू ठेवण्याबद्दल एस.टी.चे आभार मानावे तेवढे कमी. निदान ट्रेकर्स तरी ह्याला नक्कीच दुजोरा देतील. ह्या गप्पांमध्ये आम्हाला सोबत होती कान खाली पाडून बोटभर-वितभर सरकत, हात-पाय ताणत आमच्या सतरंजीवर आलेला काळे काकांचा आळसावलेला भुभू राजा, अर्धा डझन मोठ्या कोंबड्या (जिवंत) आणि त्यांची पिल्लावळं ह्यांची.

      उरलेल्या ३ स्टूजेसना येता-येता रात्र झाली. रात्रभर बाहेर पाऊस कोसळतच होता आणि कुत्रं गोणपाटावर झोपतं तसं मुटकूळं करुन आम्ही कसंतरी कुडकुडत डुलक्या काढत होतो. पहाटे ५.४५ म्हणजे अगदी वेळेवर एस.टी. निघून गेली. पाऊस चालूच होता. सकाळी पाऊसत्याचं काम संपवून जरा ओसरला तसं आम्ही स्वतःहून जायची मानसिक तयारी करून, पुन्हा पाण्यात दगड टाकायचा म्हणून मामांशी बोलायला सुरुवात केली. शेवटी, पूर्ण वाट नाही पण निदान चौर्यापर्यंत सोडायला मामा तयार झाले. वाटेत पाण्याची टाकी आहेत त्या जागेलाच गावातले लोक चौर्या म्हणतात. ह्यावेळेस शंकर मामांचे आडनाव बंधू, मारुती शेडगे सुद्धा आमच्या सोबतीला होते. सोबत हुशार आणि तरतरीत दिसणारे २ कुत्रे, शंकर मामांचा पांढरा ‘राजा’ आणि मारुती मामांचा काळा ‘काळ्या’. आम्ही घाटमाथ्याकडे धूम ठोकली.

      निसणी आणि लिंग्याघाटाच्या वाटा डावीकडे ठेऊन आम्ही उजवीकडे असलेल्या टेकाडाकडे वळलो. अगदी टेकाडावर न जाता त्याच्या पोटातल्या कारवीतून वाट काढत आम्ही एका नाळेशी पोहोचलो. ह्या भागाला गावातले लोक दुर्गाडी म्हणतात. मामांपाठोपाठ आम्ही नाळेतून खाली उतरायला सुरुवात केली. पुन्हा पावसाला सुरुवात झाली होती आणि त्यामुळे नाळेतला चिखल आणि चिकट झालेले दगड-गोटे ह्यामुळे एकूणच आमची गाडी हळूहळू पुढे जात होती. मामा आपले टपाटप ह्या दगडावरून त्या दगडावर उड्या मारत उतरत होते. साधारणतः ३० मिनिटे तसा प्रकार केल्यावर आम्ही उजवीकडच्या पदरात शिरलो. कारवीतून वाट काढत एका मोकळ्या जागी आलो. तिथून लिंग्याघाटाच्या अगदी समोरची  नाळ दिसली. पावसाळ्यात इथून धबधब्यांचा प्रताप पाहून डोळ्याचं पारणं फिटेल अशी ती जागा. तसंच कारवीतून पुढे आल्यावर एक मोकळा माळ लागला. गेल्या रविवारी साधारण ह्याच वेळी माझी आणि प्रितीची चर्चा झाली होती की इथं येता येईल का आणि आज आम्ही तिथं होतो, अर्थात मामांच्या मदतीमुळेच.

      ब-याच वेळा असं होतं की आपण काहीतरी ठरवतो आणि नंतर त्याला तडीस नेत नाही. ट्रेकचं पण तसंच आहे. ठरवा, पोतडी भरा आणि निघा. ट्रेकला जाण्यापूर्वी माहिती घेणे जरुरी आहे. पण, कधीकधी आपण खूप अभ्यास करत बसतो आणि ट्रेक तसाच राहून जातो. माझं वैयक्तिक मत (खास करून घाटवाटांबद्दल) असं आहे की त्या-त्या वाटेची माहिती आणि अजून नवीन वाटा त्या-त्या जागी जाऊन पहिल्या आणि गावच्या वयस्कर माणसांशी चर्चा केल्यावर चांगल्याच कळतात. बाकी अभ्यास तर चालूच असतो की आपला. इथल्या लिखाणाप्रमाणे आम्ही तिथंही इथं-तिथं वाट सोडून फेरफटका मारला, फोटो-फोटो खेळलो. इतक्यात मामांनी न राहवून हाळी दिली. दोन्ही मामा पाण्याच्या टाक्यापाशी उभे होते. चांगलेच मोठे असे एक आणि त्याहून थोडे छोटेखानी असे एक अशी २ पाण्याची टाकी पाहून ही वाट वापरातली होती ह्यावर मला नक्की विश्वास बसला.

      आम्हाला वाटलं की आता इथून पुढे वाट आम्हालाच शोधावी लागणार, पण मामा अजून पुढे जात राहिले आणि त्यांनी खात्री केली की ते आम्हाला योग्य वाटेला लावूनच परततील. त्यांनी आमच्यासाठी आत्तापर्यंत केलेली २-३ तासाची मरमर त्यांना वाटणा-या आपुलकीची ग्वाही देत होती. ऐनाच्या झाडांची जागा आता बोच-या काट्याच्या झुडपांनी घेतली, डोक्यावर पाऊस चालूच. १५ मिनिटं कसं तरी अंगविक्षेप करत आम्ही एका नाळेच्या तोंडाशी आलो.
मामांनी आम्हाला त्या नळीतून सरळ खाली जायला सांगितलं, “अजिबात हिकडं-तिकडं व्ह्यायचं न्हाई, कणा-कणा खाली जाते वाट. बरं का म्याडम, न्हाई गावली वाट तर पुना वरी या. वरी यायची वाट सापडंल ना? सावकाश जा.”
      त्यांचा निरोप घेऊन आम्ही पुढे निघालो. मी आणि यज्ञेश वाट पाहायला पुढे सरसावलो. पोटात कावळे ओरडायला लागले होते पण पावसामुळे एकंदरच सगळं सुसह्य झालं होतं. आम्ही थोडं खाली उतरलो आणि वाट पाहायला थांबलो तितक्यात वरून मामांचा आवाज आला. ते अजूनही कड्यावरून आमच्यावर लक्ष्य ठेवून होते. काय देवमाणसं आहेत! हल्लीच एक विनोद वाचण्यात आला होता. जगात फक्त २ च लोकांना तुमची काळजी असते. एक म्हणजे आई आणि दुसरा म्हणजे तो माणूस जो तुम्हाला सांगतो, "भावा, स्टॅंड काढ स्टॅंड." तसंच ट्रेकला आल्यावर आईनंतर सगळ्यात जास्त काळजी असते ती गावातल्या काही प्रेमळ लोकांना.

      पावसामुळे त्यांचा आवाज काही आमच्या कानी येईना, पण मग तरीही सगळं कळल्यासारखं माना डोलावून आम्ही मामांना परत जायला सांगितलं आणि खाली उतरायला लागलो. धबधब्यातून खाली उतरताना कसरत होत होती पण थकवा अजिबात जाणवत नव्हता. मामांच्या सांगण्यानुसार आम्ही नाळेतूनच खाली उतरत होतो आणि तसंही दुसरीकडे कुठे वाटाण्याला काहीच वाव नव्हता. उजवीकडच्या भिंताडाला लागून नळीने आम्ही खाली उतरत आलो. मामांचा निरोप घेतल्यापासून साधारणतः तासभर दगड-गोट्यातून उतरल्यावर आम्ही कोकणात उतरलो. तिथं डावीकडून अजून एक मोठा ओढा येउन मिळतो. लिंग्या घाट आणि त्या समोरच्या ३-४ घळींचं पाणी पिऊन हा ओढा पावसाळ्यात दुथडी भरून वाहत असताना ओलांडणे म्हणजे मोठ्या जिकिरीचं काम असावं ह्यात तिळमात्र शंका नाही.

      निसटत्या दगडातून पुढे उंबर्डीकडे जाणारी वाट सोडून आम्ही डावीकडच्या डोंगराकडे म्हणजेच निसणीच्या वाटेकडे आमचा मोर्चा वळवला. सगळे विसाव्याला आणि खादाडीला बसायच्या तयारीत असताना मी वाट पाहायची म्हणून डावीकडे घुसखोरी केली. सवयीप्रमाणे तसाच अजून थोडं, अजून थोडं असं करत काट्यातून घुसत मी वाट शोधून काढली. खात्री करण्यासाठी थोडंसं पुढं जाऊ म्हणून मी अगदी पाच  मिनिटं पुढे गेलो आणि अचानक एका जागी येउन थबकलो. सुरुवातीला काही चौरसाकृती दगडं दिसली, मग नेमकं काय प्रकरण आहे ते पाहण्यासाठी अजून फेरफटका मारला आणि पुरता वेडा झालो. एकावर एक अगदी पध्दतशीर रचलेली दगड, जुन्या पडक्या बांधकामाचे अवशेष, कोरीव पाय-या इ. मग कुठे दिवा पेटला डोक्यात कि आपण कोळी राज्याच्या दरबारापाशी आलोय. मामांनी आधीच्या बोलण्यात त्याचा उल्लेख केला होता. मग मात्र सगळ्यांना आपलंसं करण्यासाठी खाली धूम ठोकली. तोपर्यंत खालची मंडळी वाट पाहतच होती. त्यांनी त्यांचं थोबाड उघडून माझी कानउघडणी करण्याआधी मी वरच्या गमतीची बडबडगीते गायली. मग मला लाडू आणि खजूर आणि अजून ब-याच प्रकारचा खाऊ पुरवण्यात आला. तो अक्षरशः हादडल्यावर पुढच्या पाचंच मिनिटात आम्ही वर चढत होतो.

      राजवाड्याच्या भागात बक्कळ फिरून खूप समाधानी झालो होतो, हरपलेलं भान घड्याळ बघून पुन्हा आकडेमोडीत गुंतलं. आता निघायला हवं. अगदी जेमतेम अर्धा तास वामकुक्षी घेऊन पाऊस पुन्हा पूर्ण तयारीनिशी हजर झाला. ज्याप्रकारे अंधारून आलं होतं ते पाहता चिपाचं दार हुकणार होतं. पण मला त्याची खंत नव्हती. अशावेळी मी एक गोष्ट आठवतो: Harvey Voge ने म्हणलं आहे, "Mountains will always be there, the trick is to make sure you are too".

      समाधानी मनाने आम्ही राजवाड्यामागची सोंड चढायला घेतली. माझ्या आणि प्रितीच्या अंदाजाप्रमाणे त्या वाटेने आम्ही कुर्डूपेठहून निसणीच्या वाटेकडे जाणा-या पाऊलवाटेवर येणार होतो, आणि तसंच झालं. पण ही चढाई जरा छातीवर येत होती, त्यात आम्ही दमलेलो. अगदी सर्वसाधारण गतीने आम्ही वर चढून येताना पाऊण तास कसा गेला ते कळलंच नाही. निसणीच्या वाटेला ही वाट येउन मिळते तिथं उंबराचं मोठं झाड आहे हे मामांनी आम्हाला आधी म्हणजे मागच्या आठवड्यात सांगितलं होतं. धन्य आहेत ते. मग काय गेल्या आठवड्यातच तुडवलेल्या वाटेने डोळ्याचे पारणे फिटतील असं दृश्य पाहत आम्ही टॉवरपर्यंत आलो. पाऊस आता दडी मारून बसला होता. चीपाचं दार पण झालं असतं अशी कुरकुर लागली खरी पण जास्त वेळ नाही. तिथंच निवांत जागी बसून गप्पा मारत जेवण उरकल्यावर थकवा कुठच्या कुठं पळून गेला होता. गावात परत आल्यावर मामांनी आग्रहानं पाजलेला चहा, काळे मामांनी केलेलं कौतुक आपुलकीचा एक ठेवा कायमस्वरूपी देऊ करून गेला. भेट लवकरच होणार होती हे आम्हाला माहित होतंच. चिपाचं दार उघडलं होतं.

तुम्ही म्हणत असाल कि ह्याला मी कोडं का म्हणतोय? साधा तर ट्रेक आहे. घाट माथ्यावर एक गाव, गावातून ४ घाटवाटा असं नेहमीचंच समीकरण. माझ्यासाठी तरी हे एक कोडं होतं आणि त्याला बरीच कारणे आहेत.
१. 'चिपाचं दार' ही कोणत्याही पुस्तकात उल्लेख नसलेली वाट. मान्य आहे कि अश्या बर्याच वाटा आहेत सह्याद्रीमध्ये.
२. लिंग्याघाटाला देवघाट समजणे, निसणीच्या वाटेला लिंग्याघाट समजणे, निसणीची वाट आणि देवघाट ह्या दोन्ही एकच असा गैरसमज.
३. लिंग्याघाटाला तसं नाव का दिलं गेलं असेल ह्याबद्दल असणारं दुमत.
४. जरा लांब पण सोपी असली तरी सहजा-सहजी देवघाटाची वाट
दाखवण्याबद्दल गावकर्यांत असलेली उदासीनता.
५. दुर्लक्षित अवस्थेत व विशेष माहित नसलेला कोळी राज्याचा राजवाडा. खरंतर राजवाडा म्हणण्यासारखं तिथं काही उरलं नाहीये, पण भेट द्यावी अशी जागा ती नक्कीच आहे.

कुंभ्या घाट - तेल्याची नाळ

टीप : वेलांटी, उकार ह्यांत काय बी चूका दिसल्या तर सहन करा किंवा comment म्हणून टाका.

      गुरुवारी, मोठा साहेब घरला गेल्यावर ऑफिसमध्ये बसून चकाट्या पिटत असताना डोक्यात किडा आला. भराभर फोनाफोनी केली आणि नेहमीप्रमाणे जुन्या मित्रांनी नन्नाचा पाढा गाऊन दाखवल्यावर मात्र डोचकं जागेवरून हललं, च्यायला काय व्हायचं ते होऊ दे, आज म्या ट्रेक ला जाणारचं.

      नोकरदार झाल्यापासून बऱ्याचशा ट्रेकची आकडेमोड डोक्यात करून झाली होती, नकाशे गिरवून झाले होते, फकस्त घरातून बाहेर पाडायचं बाकी होतं. हल्ली तो काय लोकांनी उच्छाद मांडलाय फेसबूकवर 'आली  लहर, केला कहर ' का काय ते अनं 'मंदीत  संधी ' कि काय तत्सम प्रकार करायची संधी चालून आली होती. उंडारत फिरायचा चंग मात्र डोक्या पक्का बसला होता. इथून-तिथून माहिती गोळा करून बरेच प्लान तय्यार होते, मग त्यातला एक निवडला . रेटवायला गाडी आहे म्हणून पानशेत पलीकडच्या भागाची निवड झाली. आम्ही ३ डोकी, २ फटफट्या जाणार अस ठरलं. मग मी गप-गुमान सामान गोल करून घरी पोतडी भरली. पहाटे ४ ला निघायचं ठरलं होतं. साधरणतः ३ वाजता मित्रानं फोन केला.

मित्र: "अरे ऐक ना, भाड्या शिव्या घालू नको आता. अरे, आई नको म्हणतीये रे जयला, आणि मला पण पोटात जरा गुडगुडतयं रे, आपण next week जाऊया का? "

मी : "काशी कर, तू डब्बे टाकत बस, आम्ही दोघं जातोय !!"

मित्र : "अरे YZ तुला त्याचा मेसेज नाही आला का? तो पण येणार नाहीये, त्याचा KT च्या recheck चा result आलाय. बोंब बसली आहे परत. अपेक्षेप्रमाणे घोडे लागलेत त्याचे."

(डोळे चोळत, कपाळाला हात!)
मी: "मग तू काशी कर, त्याची तशीही तिरडी उठणार उद्या! आणि ऐक रे, मी जातोय!"

      काय ते घंटाभर झोप होणार होती ती पण पाण्यात. पहाटे ४.३० ला मी गाडी घेऊन बाहेर पडलो. फूल-बाह्यांचा शर्ट, त्यावर स्वेटर, डोक्यावर माकडटोपी एवढा सगळं गुंडाळुन सुद्धा थंडी गोठवत होती. त्यात गाडी सुद्धा अधून-मधून डुरुक-डुरुक करत त्रास देत होती. कशीतरी गाडी हाणत, शेकोटी दिसलं तिथं हात शेकत मी दापसार्यात पोहोचलो. श्री. धोंडीबा मोरे ह्याचं घर गाठून हाक मारली. अतिशय सरळ आणि बोलक्या अश्या मामांनी मला कसा ओळखतो असा विचारलं.

मी : अहो, तुमचा पत्ता आणि नंबर जितेंद्र बंकापुरेने दिला. ते आले होते तुमच्याकडं पावसात.

मामा : पुण्याचं का?

मी : हो.

मामा : त्यातले एक-दोन पोर सोडलं तर ते लई भारी चलतेत सगळे. टर्याक्टर वालं तर तुला माहित च असंल.

मी : हो. (आणि जो काय हशा पिकला तिथं कि सांगायला सोय नाही)

      मामांशी बोलून, वाटेबद्दल सविस्तर माहिती काढून, त्यांच्या पडवीत गाडी लावून मी घोळ कडे पायपीट सुरु केली तेव्हा ८ वाजले होते. गावापासून थोडं चालल्यानंतर गाडीरस्ता डाव्याबाजूने वर चढायला लागतो, तिथं उजवीकडे झाडीत पायी जाणार्यांसाठी शोर्ट-कट आहे. तो चढ चढून वर येऊ पर्यंत डिजल इंजन तापलं होतं. मनातली इच्छा आणि पाउलवाटेवर धावा बोलायला तयार असलेले पाय, यामध्ये सुटलेलं पोट आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होतं. सकाळी गावाबाहेर परसाकडं आलेल्या लोकांपासून नजर इकडे-तिकडे भिरकावत घोळ गावात पोहोचलो तेव्हा ८.४५ वाजून गेले होते. इतर घाटमाथ्यांच्या जवळ असलेल्या गावासारखं, घोळ गाव तसं बर्यापैकी एकलकोंडी आहे, आणि हल्ली स्वच्छ आहे.

      घोळ गावातून माझ्या ऐकण्यात ३ चांगले ट्रेक होते. एक म्हणजे गर्जाईवाडीतून कोकणदिवा त्यापुढं कावळ्या घाट किंवा दुसरा म्हणजे घोळ ते खानु ट्रेक अन त्यापुढं बोचेघोळ नाळेनं खाली कोकणात वरिंगीत जाता येतं , आणि तिसरा म्हणजे कुंभ्यातून खाली माणगड चा ट्रेक, ज्यासाठी मी आलो होतो. हा ट्रेक तसा मोठा आहे. घोळ ते कुंभेगाव ते माजूर्णे ते मशिदवाडी आणि तिथून माणगड. मला वाटेची सुरुवात पुसटशी लक्षात होती, पण आता गावातून सिमेंटचा रस्ता झाल्यानं मला काही कळेना. मग एका मामांना वाट विचारून घेतली.

मामा : अरे वाट लय सरळ हाय, पन तू एकटा का जातुया? सोबत न्हाई कुणी? धा वाजायलेत, पोहोचायला लय ऊन होईल.

मी : ( "पहिले पाढे पंचावन्न" अश्या अविर्भावात ) आता काय करणार मामा, कुणी येईना झालंय, मग एकटाच निघालो.

आणि मी आधी वेळ पाहिली. मामाचं घडयाळ चांगलं तासभर पुढं होतं दिसतंय. आत्ता कुठं ९ वाजले होते. तासाभरात तर आम्ही सकाळच्या साऱ्या विधी उरकून गाडी दामटवत हापिसात पोहोचतो.

मामा : माजूर्ण्यात जागा-बिगा पाहाया जातंयस काय? तिथं पार कुंभ्यात रस्ता आलाय आता. जागेला लई भाव.

मी  : नाही हो, मी भटकायला आलोय.


      एवढंच काय ते बोलून मी काढता पाय घेतला. मामांच्या बोलण्यातनं ज्या गोष्टी समजल्या त्याचं वाईट वाटत होतं. बारामतीच्या चोरांच्या आणि तत्सम हरामखोरांच्या नजरेत लवासापाठोपाठ आता हा भाग पण सलत आहे. वाटून गेलं कि बरं आहे मी आलोय, एकदा कां हा भाग so-called Develope झाला तर मग इथ माझ्यासारख्यांच घोडं कशाला येतंय? विचार करत अर्धा तास कधी चाललो ते कळलंच नाही. एव्हाना घोळ गाव आता मागे डावीकडे राहिलं होतं. वाट उजवीकडून फिरून येते. वाटेत एक आजोबा भेटले, त्यांनी जरा शोर्ट-कट दाखवून दिला

आजोबा : तिथं म्होरं वाट डावीकडं जाती, तिथंच उजवीकडं  बोरीत शिरायचं आणि कडं-कडंनं जायचं. खरी वाट खालनं हाय पन तिथं मधमाश्या उठल्यात. माशी वर आली तर कायबी भ्यायचं न्हाई. गप-गुमान कडं-कडंनं जायचं.

मी : बर आजोबा. चिक्की खाणार का? पाणी हवंय?

आजोबा : दाताला येती का पाहू, पाणी दे मोप असलं तर.

      मी आजोबांना पाणी दिलं आणि चिक्की देतो तोच त्यांनी लाल पेरू काढून दिला. आणि पुन्हा एकदा वाट समजावून दिली आणि आजोबा गेले. मी आपलं हळू-हळू चालत त्या फाट्यावर आलो, आणि मग उजवीकडची वाट धरली. खाली डावीकडच्या झाडीत माश्यांची भुणभुण ऐकू आली आणि मग मी थोडं घाबरतच तिथनं सटकलो. एक मोठ्ठा माळ तुडवत साधरणतः १०.०० च्या सुमारास मी एका टेपाडाच्या पोटाशी आलो, तिथं ओढ्याला थोडं पाणी होतं. तिथं बसकण मारली. दूर तिथं कोकणदिवा छाताड काढून उभा होता, आणि खाली ते कावळ्या घाट चढताना डाव्या बाजूला दिसणारे छोटे-छोटे टेकाड डोकं वर काढत होते. मग मला पेरूची आठवण झाली. पेरू पाठोपाठ, बांधून आणलेली मूठभर सुकी भेळ पोटात ढकलून पाणी ढोसून मी निघालो. इथं मोबाईलला network नाही.

      थोडं पुढे जाऊन डाव्या बाजूनं त्या टेकाडाला अर्धा वळसा घालून, वाट त्याच्या डाव्या अंगावर घेऊन जाते. तिथून पुढं टेकाड-वळसा मग माळ असा भारी प्रकार सुरु झाला. अशी पायपीट अजून एकदा केली आणि मग गुगली पडली: २ वाटा - त्यातली एक डावीकडून वळसा घालणार आणि दुसरी उजवीकडच्या झाडीतून थेट वर. जवळ नकाश्याची प्रिंट नाही, अन मरायला GPS पण नाही. मग तिथं थोडं डोकं खाजवून, कोकणदिव्याच्या दिशेवरून थोडा अंदाज घेऊन उजवीकडची वाट धरली. धापा टाकत, कारवीतून हलका चढ चढून वर एका खिंडीत आलो. मस्त गार वारा लागला आणि एका मोठ्या पठारापलीकडं कोकण दिसलं. म्या भरकटलो नसल्याचं पक्कं झालं. खिंड आणि त्यात तिथं हळदीची पुडी दिसल्यावर जवळ देवाचं ठाणं असलंच पाहिजे. मग सॅक ठेऊन सोबत पाण्याची छोटी बाटली घेऊन मी डावीकडं झाडीत शिरलो. वर-खाली असं अर्धातास भटकल्यावर शेवटी दगड-देव सापडला. खिंडीतून तिथं जायला ठळक नसली तरी तशी सोपी वाट होती.

      इथून वाट अगदी मस्त ठळक आणि मळलेली होती, वाटेत एका ठिकाणी छान गार पाणी पण आहे. उन्हाळ्यापर्यंत ते नसेल हे नक्की. पाणी ढोसून जरासं काय झाडीतून बाहेर आलो कि दूरवर JCB चा आवाज आला, आणि कुंभ्याची वस्ती जवळ आली आहे ह्याची खबर देऊन गेला. वाट थोडी डावीकडं वळली अन वाडी नजरेत आली. शिवथरच्या खुट्या घाटावर ते कुंड गाव आहे अगदी तशीच कुंभ्याची वाडी. कुंभ्याच्या वाडीच्या उजवीकडे एक मोठ कुरण आहे, तिथं जाण्याचा मोह काय मला आवरता आला नाही. वरून खाली डोकावून पाहिलं, खाली दूर कोकणात MIDC दिसली, कोणती ते माहित नाही, बहुदा विळे-भागडची असावी. त्याअलीकडे कडपे, जिते, दूरवर विश्रामगड / कुर्डूगड दिसला. मुख्य रांगेपासून सुटावलेला विश्रामगड आणि मी यामध्ये कुठतरी ठिपठिपची नाळ आहे.

      माझा खरा प्लान असा होता कि कुंभ्यानं माजूर्ण्यात जायचं, माणगड करायचा, बोरवाडीतून निझामपूर, तिथून पुढं जिते आणि तिथनं ठिपठिप्या आणि मग दापसरे. पण भिडे गुरुजींची मोहीम माजूर्ण्यातनं गेली आहे म्हणाल्यावर रस्ता पुरता थोपटवलेला असणार, त्यात माजूर्ण्यापर्यंत मातीचा कच्चा रस्ता उन्हात तुडवणं म्हणजे अशक्य चिडचिड ! माणगड आणि तो मधला ४०० m चा बोगदा पहायचं टाळून मी डोक्याचे काटे पुन्हा फिरवले. एकटाच असल्याने माझं मत ते बहुमत असा प्रकार होता. मग गाडी-रस्त्यावरची पायपीट टाळून पदरातलं जंगल तुडवत ठिपठिप्या गाठायचं खुळ माझ्या डोक्यात आलं. म्हणजे मग गावात तशी चौकशी करायला बरं. नाहीतर मी एकटा आहे म्हणाल्यावर मला गावातले लोक साहजिकच माजूर्ण्याला पाठवणार ही भीती होती.

      १२ च्या सुमारास मी पोटातल्या पोटातल्या जंगलात उतरत होतो. बडत्याचीमाची - बोरमाच - कुंभामाची करत ठिपठिप्या घाटात यायचं ठरलं होतं. साधारण २० मिनिटात मी पदरातल्या जंगलात पोहोचलो. तिथनं बडत्याची माची म्हणजे अजून १० मिनिट चाल. इथून पूर्ण ट्रेक म्हणजे वाट अगदी सरळ साधी आणि सोप्पी होती. बडत्याच्या माचीत आल्यावर मला lunch करायचं सुचलं. वाडीत काही गुरं, कुत्री आणि २-४ म्हातारी मंडळी सोडली तर कुणीच नाही. मोदी येणार असल्याने सगळे रायगडाकडे गेले असणार.

      गावापलीकडं एक मस्त मोठं झाड गाठून मी जेवायचं ठरवलं. ठरल्यापणे मी झाडाखाली बसलो, अख्खी sack उलटी केली तरीही जेवणाची पिशवी सापडेना. मग ध्यानी आलं कि पिशवी टेबलावरच राहिली, मग अजून एक चूक ध्यानी आली कि, त्यासोबत मेडीकीट पण घरीच राहिली आहे. भयंकर चिडचिड झाली. पोटातले कावळे आता अजूनच बोंबलायला लागले. पुन्हा वाडीत येउन दुकान आहे का ह्याची चौकशी केली. मग कळलं कि इथं काही नाही पण बोरमाच ला एक दुकान आहे. मग मात्र बोरमाच कडे धूम ठोकली.

      इथून बोरमाचपर्यंत ही तशी तासभर लांब पण सरळ-सोट चाल आहे. घोटभर पाणी पीत-पीत, पोटातला कलकलाट बंद करत मी बोरमाच मध्ये पोहोचलो. म्हणू नये, पण गुरं कशी भेदरलेल्या नजरेनं पाहतात तशी  गावातली मंडळी मला पाहत होती. शेवटी थोडी विचारपूस करून मी श्री. म्हाळुंगे ह्यांच्या छोटेखानी दुकानात पोहोचलो. तिथं पारले-G बिस्कीट मिळालं. मग पाणी आणि पारले-G खाऊन पोटोबा शांत केला, घडयाळात पाहीलं कि १.४५ झालेत. डिजल इंजन आता थकलं होतं. ट्रेकला एकटा असल्याने Lunch शेअर करायला लावून अजून कुणाचा छळ केला नाही ह्याचा मनोमन आनंद झाला. एकट्यानं ट्रेक करताना आपल्या कुवतीची जाणीव होते, मनातल्या विचारांना मोकळा वेळ देता येतो. आणि डोक्यातलं वादळ शांत करता येतं, हे माझं वैयक्तिक मत आहे.

      भानावर येउन २.०० च्या सुमारास पुन्हा गाडं हाणंल. म्हाळुंगे काकूंनी सांगितल्याप्रमाणे कुंभामाची इथून अर्धा तास होती. जेवून मस्त आळस आला होता, तरीच वाट चुकलो. आणि म्या डोंगराच्या अगदी पोटाशी येउन झाडीत अडकलो. पायाखाली जी वाट होती ती नक्कीच ढोरवाट असावी. मग अजून थोडं पुढं गेल्यावर उजवीकडच्या नळीतून एक वाट खाली आली. का कि देवजाणे मला ती वाट म्हणजे ठिपठिप्याची नाळ वाटली. मग मी तरीही थोडं पहायचं ठरवलं. थोडं पूढे गेलो आणि पाहिलं तर ती वाट उतरून उजवीकडंच जात होती. मग त्या नळीत अजून वर चढून जायचं ठरवलं. वर दाट कारवी दिसत होती. तरी थोडं वर चढल्यावर उजवीकडं वाडी दिसली. मग मी अंदाज बांधला कि ती साखळेवाडी असावी, फोना-फोनी करून खात्री केली आणि नाळेत वर चढायला सुरुवात केली.

      चांगलाच घाम काढला नळेनं. ३.०० वाजताच्या सुमारास, नळीत साधारण ६० % चढल्यावर वाट पुसट झाली, मोडली होती. त्यात आदल्या रात्री न झोपल्यानं आणि धड न जेवल्यानं माझा दमेश भुकेश खन्ना झाला होता. भुकेनं सुधरतच नव्हतं. पायात गोळे यायला सुरुवात झाली होती. मग जरा इकडे-तिकडे घुसून वाट शोधली, एक-दोन वेळा उजवीकडच्या काटेरी झाडीत अडकत पुन्हा मधोमध असलेल्या कारवीत शिरलो. जेमतेम अर्धा लिटर पाणी शिल्लक होतं, ते वाचवत पाण्याचे घोट घेत चढाई सुरु ठेवली.. मग तसंच जोर काढत शेवटी वर पोहोचलो आणि बसकण मारली.

      झाडीतून थोडं मोकळ्या जागी आलो अन पुन्हा कोकणदिवा दिसला! आता मात्र घाम फुटला. कारण जेवढं मला कळतंय, ठिपठीप्यातून कोकणदिवा दिसणारच नाही, शक्यच नाही! मग उजवीकडे थोडी नजर फिरवली कि उमगलं कि आपण पुन्हा घोळ जवळ घाट-माथ्यावर आलोय, वाट कोणती ते माहित नाही. पण नक्कीच ही ठिपठिप्याची नाळ नाही. आता हसावं कि रडावं ते कळेना. आढावा घेत असतानाच मग गुराला दिलेली हाक कानी आली. आणि मी त्या दिशेने धाव घेतली. श्री. हरिश्चंद्र पोळेकर आपली गुरं हाकत होते. मग त्यांच्याबरोबर साधारण २० मिनिटे चालत मी घोळ गावात आलो. येता-येता काकांकडून माहिती मिळाली कि मी ज्या वाटेने आलो ती तेल्याची नाळ आहे. त्यांच्याच घरी पाणी पिउन मी दापासर्याकडे निघालो.. safe & sound. तासाभरात मी दापसर्यात पोहोचलो आणि मामांचा निरोप घेऊन पुण्याकडे निघालो. एव्हाना काही प्रश्न मनात घर करून बसले होते.

      मी हे असंख्य वेळा ऐकलं आहे कि ट्रेकिंग हे एकट्यानं नसावंच, त्रिकुट-चौकट तर असावीच. ह्या ट्रेकच ही तसं म्हणता येईल. उतरताना किंवा चढताना पडला असतास तर काय? वाटेत काही चावलं असतं तर काय? मग नेटवर्क नसतं तर काय? हे करून मिळालं तरी काय? आणि असंख्य तत्सम प्रश्न. खरं सांगायचं झालं तरं हे प्रश्न काहींना हा ब्लॉग वाचल्यावर पडू शकतात, फरक एवढाच आहे कि हे प्रश्न मला ट्रेक सुरु करायच्या आधी पडतात, आणि होय, तरीही मी जातो.

'का?' ह्या प्रश्नाची बरीच उत्तरं आहेत.
'नाही गेलास तर नाही का चालणार?' ह्याचं एकचं उत्तर : नाही चालणार!
'पुन्हा जाशील का?' ह्याचं उत्तर माझ्याकडं पण नाही.

हं, माझ्या सोलो ट्रेक बद्दल तुम्हाला काही आक्षेप असेल तर तसं सौम्य आणि तुम्हालाच शोभेल अश्या शब्दात वैयक्तिक संदेशाद्वारे सांगा, चर्चा करू. उद्धटपणे व्यक्त केलेल्या मताला किंवा टीकेला मधले बोट किंवा आरसा दाखवण्यात येईल.

I do not intend to motivate/discourage anyone from trekking/solo-trekking. I believe this and every other trek has taught me a handful of things. I simply don't expect anyone to pack his/her sack and set off to a solo trek after reading this or any of my blogs.

ठिपठिप्या घाट - कुर्डुगड - निसणीची वाट - दापसरे

टीप : वेलांटी, उकार ह्यांत काय बी चूका दिसल्या तर गप-गुमानं सहन करा किंवा पाठीमागे चर्चा न करता comment म्हणून टाका.

      लोकांसाठी उन्हाळा म्हणजे आंबे, मुरंबा-साखरांबा खाण्याचा महिना. ट्रेकाड्यांचं ही काही फारसं वेगळं प्रकरणं नाहीये. फरक एवढाच कि त्यांना ते पेटीतले हापूस, घरी भर्र पंख्याखाली किंवा बक्कळ पैसेवाला असेल तर AC खोलीत बसून, "काय गरमी आहे, काय गरमी आहे" असा दिवसातून १५ वेळा जप करत खाण्यापेक्षा, जंगलात जाऊन तिथले आंबट-गोड आंबे हादडायला जास्त आवडतं. त्यात भोजनोत्तर मुखशुद्धी करायला करवंदं आणि जांभळं असतातच. खरंतर त्याला सोडून इतरंना जमेची बाजू एवढीच कि ह्या ट्रेकाड्याच्या घरच्यांना काहीसा वाव असतो ह्याचं घोडं गप करून घरी बसवायला. बाकी हिवाळा आणि पावसाळा आला कि ह्यो कुणाचं बी ऐकत नाही. ट्रेक करताना जो करपून काळं-कुट्ट होणार आहे किंवा झाला आहे, तो स्वतः सोडून बाकी सगळ्यांना ह्याची अन ह्याच्या रंगाची काळजी! हां, जर का जन्मतःच "color गेला तर पैसे परत" असा कट्टर कृष्णवर्णीय असेल तर मग त्यात थोडी सवलत मिळते.

      शुक्रवारी हाफिसातून सगळे कलटल्यानंतर थोडा मोकळा वेळ मिळाला, मग तो wikimapia वर नकाशे गिरवण्यात घालवायला सुरुवात केली. विमान उडत-भरकटत शेवटी घोळावरचं आलं. मग जुना अर्धवट राहिलेला, आणि खरंतर भयंकर फसलेला प्लान टिचकी मारून गेला. वेडापशीनं ठरवलं आणि ह्या वेळेला हा पुन्हा एकट्यानं तडीस न्यायचा असं बहुमत झालं. जवळचाच one-day ट्रेक असल्यानं घरची आघाडी थोडीशी धडधडून का होईना पण शांत झाली. शनिवारचा दिवस सगळी कामं उरकण्यात घालवला. गाडीवर जायचं असल्यानं काही खास वेळापत्रक मांडायची गरजच नाही वाटली. गेल्या वेळेस एकटा  By Force होतो, ह्या वेळेस By Choice.

      ह्यावेळेस मात्र अगदी checklist काढून पद्धतशीर सगळं समान गोळा करून सॅक भरली. Tang घेण्याच्या नादात Electral घरीच विसरून, रात्री १ वाजता म्या गाडी घेऊन निघालो. कात्रजच्या चौकात पोहोचलो आणि गाडीतून काय-काय विचित्र आवाज आला. नकळत म्या गाडी थांबवली. वाटीत गोटी ठेऊन वाटी गरागरा फिरवावी तसा काहीसा तो आवाज होता. गाडीची थोडी आदळ-आपट करून मग गाडी चालू केली तर पुन्हा एकदम मस्का firing. म्हणलं नेऊ गाडी हळूहळू.

      खड्ड्यात अगदी जपत गाडी नेत मी दापासार्यात पोहोचलो तेव्हा ३.३० वाजले होते. लग्नाच्या मुहूर्त गाठून कुणीतरी दापासार्यात कल्ला केला होता. गेल्या खेपेला जिथून मोरेमामांच्या घरासमोर गाडी नेली होती, तिथं सगळी गावची मंडळी विदेशी टाकून थर्राट पडली होती. मग म्या गाडी तशीच पुढे शाळेपाशी लाऊन वर्हांड्यात पथारी टाकली. ते दापासार्यातलं कोंबडं ४ वाजताच आरवाया लागलं. कशाची झोप लागतेय आता, वाटून गेलं कि धरून द्यावं एखाद्या कसायाला, जशी माणसं बाराच्या भावात जातात, तसं हे किलोच्या भावात जाईल. माकडटोपी घालायची पाळी येण्याएवढी गुलाबी थंडी होती, त्या कोंबड्याला मनोमन शिव्या घालत कानात बोळा कोंबून तशीच २ तास डुलकी काढली.

      सकाळी ६ वाजता पुन्हा मोरेमामांचं घर गाठलं तेव्हा तो सारा लवाजमा अजून लोळतच होता. मामा मात्र एकदम मस्त नहा-धोके तय्यार! चला म्हणालं वेळ वाचला. तेव्हाच तिथं एक अजून थोडे वयस्कर मामा आले. ते ही मोरेच.

मोठे मोरे मामा: "कुठं निघालास रं पोर्या ? कोकनदिव्याला जायचंय काय ? पुढं घोळात गेलाय कि रस्ता, येष्टी बी येतीय पुण्यातनं. पन तू एकला काहून (का म्हणून) आलायस?"
त्यांची जी काय कॉम्मेंट्री चालू झाली कि ते आता मला direct रायगडावर धाडतात कि काय असं वाटलं. धोंडिबा मोरे मामांनी माझी उडालेली त्रेधा-तिरपिट पाहून चर्चेला पूर्णविराम दिला.
श्री. धोंडीबा मोरे: अहो दाद्या, हे बेनं एकटचं येतंय इथं. मागच्या बारीला बी आलतं.
श्री. धोंडीबा मोरे (माझ्याकडे वळून): आता काय ठीपठीप्या का? चल!

      मी फक्त मुंडी हलवून होकार दिला. पुढच्या क्षणी मी अन मामा गाडी रस्त्याकडे निघालो होतो. मामांनी ठिपठिप्या घाटाच्या वाटेला लावतानाच, धामणओहोळहून  परत येताना कुठून येणार ते ही दाखवून दिलं. दिवसभर त्यांची होऊ घातलेली सर्कस जाणून मामांनी मला वेळ विचारली आणि ६.३० म्हणाल्यावर थोड्या घाईतच मामा परत निघाले.

      वाट एकदम मळलेली होती. साधारणतः 4 फर्लोंग चालल्यावर डावीकडे घाटमाथा दिसला. उजवीकडे पाण्याचा ओढा असल्याने आणि त्यात सकाळची वेळ असल्याने भरपूर पक्षी दिसले. पण माझं पक्ष्यांबद्दलचं ज्ञान चिऊ, काऊ, बुलबुल, खंड्या, etc "not so popular" मंडळींच्या पलीकडे नसल्यानं तिथं जास्त वेळ न घालवता मी घाटमाथावरून डोकावून वेळ घालवण्याकडे कल दिला. कुर्डूगड तर अगदीच जवळ असल्यागत वाटला. म्हणजे एस. एम. जोशी पूलावरून म.न.पा. कशी जवळ वाटते तसंच काहीसं गणित मी लगेच मांडून निवांत झालो. शेवटी ७.३० वाजता मी तिथून काढता पाय घेतला. 

      घाटवाट अजूनही नियमित वापरात असल्यानं जवळच्या सार्या ढोरवाटा एकदम नळीच्या तोंडाशी येउन मिळतात. नाळीच्या अगदी सुरुवातीलाच कोरलेल्या ४-५ पायऱ्या आहेत. पाण्याच्याच वाटेनं अजून खाली उतरलं कि उजवीकडे छोटं कुंड आहे, त्यात पाणी ठिपठिप पडत असतं, म्हणून हा ठिपठिप्या असं ह्या-त्या पुस्तकात आधीच वाचलं असेल. पुढे पाण्याची वाट डावीकडे ठेऊन, उजव्या सोंडेवरून वाट खाली जाते. ती उतरून मी खाली पदरात पोहोचलो तेव्हा ८ वाजले होते. इथून खाली साखळेवाडीत उतरून कुर्डूपेठेत जाता येतं. पण करवंद आणि आंबे खाण्याच्या नादात माझा प्लान इथं फसला. मी खाली साखळेवाडीत न जाता, उजवीकडे वळून पदरात असलेल्या जंगलातून कुर्डूगड गाठायच ठरवलं. पुन्हा तेच, एकटा असताना एक मत हेच एकमत असतं. ह्या गोष्टीचाच गैरफायदा घेऊन मी जंगलात शिरलो.

      पाहिला तासभर काहीच अंतर कापलं नाही, फक्त करवंद आणि आंब्यावर येथेच्छ ताव मारला. पोटाची पोतडी भरल्यावर मग दोन पावलातलं अंतर वाढवायची सद्बुद्धि झाली. पण मग अपेक्षेप्रमाणे गचपण लागलं. कारवीतून वाट काढत हळूहळू थोडा वर चढल्यावर मोठ्या झाडांच्या जंगलात आलो. इथं त्रास थोडा कमी होता, पण करवंद नव्हती. तश्यातच मध्ये-मध्ये ठराविक अंतरावर एक कोरडा ओढा पार करावा लागत होता, त्यात ओढ्याजवळ खुरटी झाडी वाढली होती. खाजवा-खाजवीचा अशक्य छळ सुरु झाला. त्यात कोकणाची आर्द्रता (Humidity). आर्द्रता हा शब्द हल्ली इतिहास-जमा झाल्यागत का वाटतोय देव जाणे. इंग्रजी माध्यमात शिकलेली मराठी पोरं  तर आर्द्रता हा शब्द वापर म्हणलं म्हणजे पुण्यात पोरींना होर्न नसलेली गाडी चालवणे किती कष्टप्रद वाटेल तसं थोबाड करतात. असो आर्द्रता ह्या किरकोळ शब्दावर एवढी गरम चर्चा नको. कारण असच एकदा माझा लोणावळा ते भीमाशंकरचा ब्लॉग वाचून एका मुलीने फोन करून धडधडीत आरोप केला होता कि "तू ब्लॉग लिहिताना पोरींना consider च करत नाहीस असं दिसतंय." आता झाली का पंचाईत! तिला तसं का वाटलं असेल हे माझ्यासाठी आजही न उलगडलेलं कोडं आहे. हो, हा तिला मारलेला टोला आहे असं वाटून गेलं तर त्याला म्या काय करणार? व्यक्ती स्वातंत्र्याचा विजय असो! तसही मला त्या एका विलक्षण विचित्र स्वभावाच्या मुलीनं  पुन्हा फोन करावा अशी माझी इच्छा अजिबातच नाहीये. (बघू आता कसं फोन करते ते !)

      जसं इथं विषयांतर झालंय तसंच वाटेच्या बाबतीतही झालं. जांभूळ शोधण्याच्या नादात मी अजून वरच्या अंगाला चढून आलो. शेवटी नाईलाजाने विचित्र अंगविक्षेप करत, मी त्या गचपणातून मोकळ्या पदरावर आलो. अगदी हुश्श झालं. गटागट अर्धा लिटर पाणी पोटात ओतलं आणि बसकण मारली. अवस्था अशी होती कि अंगाला खाज सुटली होती आणि कुणी मला B-Tex ची जाहिरात करायला दिली असती तर मी त्याचा ऋणी झालो असतो.

      थोडं सावलीला बसल्यावर कुर्डूगडाकडे नजर टाकली, आता खरोखरच जवळ आलाय हे पाहून जरा हायसं वाटलं. मग हळूहळू ११ नंबर ची बस कुर्डूगडाच्या अगदी पायथ्याशी येउन झाडीत थबकली. इथं मात्र डुलकी काढायचा मोह माझ्यानं आवरला नाही. खाऊ पोटात कोंबून मी तासभर झोपायचं ठरवलं.

      झोपलं म्हणाल्यावर तर गेमच झाला. उन्हामुळ्ये चालणं नकोसं झालं होतं. मग २-३ फोन केले, आणि इथून किती वेळ लागेल ह्याचा अंदाज घेतला. मित्रांनी तोंडपाठ असलेली पूरेपूर माहिती बडबडगीते गायल्यागत सुनावली. हे एक भारी आहे ह्यांचं, ट्रेकचं काहीपण विचारा, कधीपण विचारा, माहिती मिळणारच! एकाने तर कहरच केला, हा पठ्ठा सासरी जेवायला गेला होता, अश्या कार्यक्रमात अडकल्यावर एरवी न बोलणारा हा, ट्रेक ला आलोय म्हणाल्यावर पार त्या कुर्डूगडाच्या  मिशीवाल्या हनुमानापर्यंत पोहोचला. निघलो तेव्हा १ वाजले होते. मग गावात एकदा वाट नीट विचारून घेतली. मग गाडी थेट मिशीवाल्या हनुमानापुढं जाऊन थांबली. मिशीवाला हनुमान आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला.

      हा किल्ला तसा दुर्लक्षित पण खूप मोक्याच्या ठिकाणी आहे. रायगडाकडे जाणार्या वाटांवर हा आणि माणगड असे हे दोन किल्ले. हल्लीच "Tracking" चं खूळ चढ लेल्या, शहरी पैसाछाप ट्रेकर्सना कळलेल्या इतिहासातून हरवल्यागत वाटतात. तेही चांगलंच आहे म्हणा. त्या पलीकडचा कोकणदिवा हल्ली पब्लिक च्या demand मध्ये आहे.

      किल्ला उतरून निसणीच्या वाटेला लागलो. आता दुपारी २ च्या उन्हात जंगलापलीकडे लागणारा चढ चढायचा होता. तिथं खरा उन्हाळा जाणवणार होता. त्या घाटमाथ्यावर दिसणाऱ्या मनोऱ्याकडे पाहत चढाई सुरु केली. पहिला गिअर-दुसरा गिअर करत ढकलगाडी करत वर पोहोचलो. अगदी बोडकं असं पठार त्या मनोऱ्याच्या आणि धामणहोळच्या वस्तीच्या मध्ये आग ओकत आ वासून बसलं होतं.

      कसतरी करत मध्ये एक ठिकाणी पुन्हा करवंद-stop घेऊन गावाबाहेरच्या मंदिरापाशी पोहोचलो. इथं पुन्हा वाट विचारायची होती. मंदिरातल्या अतिशय मितभाषी अश्या गोसावी मामांना वाट विचारली. सोबत एक आजी बसल्या होत्या. एकट्यानं आणि ते पण एवढ्या उन्हात कडमडल्याबद्दल आजींनी गोड शब्दात कान-उघडणी केली खरी पण डब्यातला रव्याचा लाडू पण काढून दिला. ३ वाजले होते. म्हणून आता घाई करणं भाग होतं. मग पाण्यात डुबकी मारण्याच्या उत्साही मनसुब्यावर पाणी सोडलं आणि गूमानं पूलापासून उजवीकडची वाट धरली. इथून परत चढण सुरु होणार होती. त्यावर हा माळ.

      माळापलीकडं रेडे खिंड आणि पुढं रेडे-खिंडीची वाडी. तिथून खाली उतरलात कि दापासरे. ही साधारण ४ तासाची चाल होती असा माझा अंदाज होता. हा पल्ला तसा मोठा होता. आणि त्यात मला ह्या भागाची विशेष माहिती नव्हती. आणि दिवसभर झालेली दम-छाक विचारात घेता, मी वाटा शोधण्याच्या तयारीत नव्हतो. त्यात वाढलेलं  पोट, खाल्लेले bread, पचायला अवघड असं श्रीखंड त्यात अर्धवट झोप ह्यामुळे मला वेळेत दापासार्यात पोहोचणं गरजेचं होतं.

      मग चढ संपेपर्यंत अगदी आरामात आलो. मागे वरसगाव धरणाचं पाणी दिसत होतं, त्यावरून मध्येच एखाधी गार वार्याची झुळूक! स्वर्गीय आनंद.. मग पुन्हा नामजोशींना फोन करून कळवले, सूर्यास्ताला अवकाश आहे तोपर्यंत बंड्यानं घोडं हाणायला सांगितलं आणि मी नेमकं तेच केलं. साधारणतः ३.४५ ला मी माळावर होतो आणि तिथनं डिजल इंजन चालू केलं. माळावर लांब एक भेकर दिसलं. पावसाळ्यात तर हा भाग एकदम झाक असणार.

      माझ्यासाठी हीच खरी गम्मत आहे एकट्यान भटकण्याची, मी आजवर एकट्यानं जे अंतर कापलं ह्याचं समाधान माझ्यासाठी तरी एकमेवाद्वितीय आहे, चालेल तेवढं कमीच वाटतं. बडबड नाही, थांबणं नाही, मतभेद नाहीत कि कुणाची काळजी नाही. ज्या गोष्टींना आपल्या खोपडीतल्या "processing unit" सोबत गुजगोष्टी करण्यासाठी जो एकांत हवा असतो तो इथं भरभरून मिळतो.

      इकडं-तिकडं नजर फिरवत, हातातली काठी दामटवत अख्खा माळ कधी मागे टाकला ते कळलंच नाही. डिजल इंजन थेट रेडे खिंडीत येउन थांबवलं तेव्हा ५ वाजायला ५ मिनिटं होते. इथून वाडी फक्त १० मिनिटाच्या चालीवर आहे. सोबत आणलेली बिस्किटे, श्रीखंड, ब्रेड वाडीतल्या मामांना देऊन दापासार्याकडे निघालो. उजवीकडे ठिपठिप्याच्या नाळेशी असलेलं पठार दिसलं. मग तसंच चाल न मोडता दापासार्यात येउन मामांचा निरोप घेतला तेव्हा ६ वाजले होते. मग हळुहळु तानाजी सागरचा देखणा परिसर न्याहाळत पानशेत गाठलं. पानशेत मध्ये आलो तेव्हा अंधारून आलं होतं आणि अगदी typical वीकेंड पिकनिक पब्लिक  पुण्याकडे धाव घेऊ पाहत होतं. त्या गर्दीत हरवून ८ वाजता पुणे गाठलं, ट्रेक ठरल्याप्रमाणे वेळेत झाला होता तो ही ह्या वेळेस वाट न चुकता!

      मी हे असंख्य वेळा ऐकलं आहे कि ट्रेकिंग हे एकट्यानं नसावंच, त्रिकुट-चौकट तर असावीच. ह्या ट्रेकच ही तसं म्हणता येईल. उतरताना किंवा चढताना पडला असतास तर काय? वाटेत काही चावलं असतं तर काय? मग नेटवर्क नसतं तर काय? हे करून मिळालं तरी काय? आणि असंख्य तत्सम प्रश्न. खरं सांगायचं झालं तरं हे प्रश्न काहींना हा ब्लॉग वाचल्यावर पडू शकतात, फरक एवढाच आहे कि हे प्रश्न मला ट्रेक सुरु करायच्या आधी पडतात, आणि होय, तरीही मी जातो.

'का?' ह्या प्रश्नाची बरीच उत्तरं आहेत.
'नाही गेलास तर नाही का चालणार?' ह्याचं एकचं उत्तर : नाही चालणार!
'पुन्हा जाशील का?' ह्याचं उत्तर माझ्याकडं पण नाही.

हं, माझ्या सोलो ट्रेक बद्दल तुम्हाला काही आक्षेप असेल तर तसं सौम्य आणि तुम्हालाच शोभेल अश्या शब्दात वैयक्तिक संदेशाद्वारे सांगा, चर्चा करू. उद्धटपणे व्यक्त केलेल्या मताला किंवा टीकेला मधले बोट किंवा आरसा दाखवण्यात येईल.

I do not intend to motivate/discourage anyone from trekking/solo-trekking. I believe this and every other trek has taught me a handful of things. I simply don't expect anyone to pack his/her sack and set off to a solo trek after reading this or any of my blogs.