पुण्याहून
सुरुवात असल्यानं रेल्वेलाही घाई हा प्रकार माहीत नव्हता. ३ मिनिट उशीरा का होईना
गाडी निघाली आणि यार्डात येऊन १० मिनिटं थांबली. सागरचा अप्पर, माझा मिडल बर्थ आणि
लोवर बर्थला एक आंटीजी.
"आंटीजी,
आपको जब सोना हो बस बोल दिजीये" इति मी, आणि "में तो साला पुरा दिन सो
सकता हूँ!" इति माझं मन.
"हा
बेटा जरूर" म्हणत आंटींनी उशी उचलली, पाठीशी ठेवली, मांडी घातली आणि पहिला
आऊट-स्विंगर लेफ्ट-अलोन केला.
म्यानेजरांच्या
फोनवर गाडी खडकीला थांबली. हापिसचं काही काम नाही म्हणून सुरुही झाली. गप्पा मारत
कर्जत पास झालं आणि पँट्रीवाला जेवण घेऊन आला. सागरला डोंबिवलीला HDFCचा नाका
दाखवून दारात गप्पा मारत वसईकडे निघालो. दुपारी पाळण्यात झोपायची दुर्लभ
सुवर्णसंधी अशी उगीच दवडायची नाही ह्यावर एकमत झालं आणि मग आम्ही पक्ष्यांमधनं वाट
काढत जागेवर आलो आणि गप पडी मारली.
वामकुक्षी
उरकल्यावर पुन्हा खाली येऊन बसलो तोच समोरच्या ताईनं डायरेक्ट चौकार टाकला:
"हे आहेत ना, ह्यांना खेळता येत असेल रमी, येते ना?"
मी
मान डोलावली, आणि सागर पण वरच्या मजल्यावरून खाली आला.
"हम
भी कार्ड्स खेलतें हैं" म्हणत बाजूच्या आंटींनी Attitude-Adjustment केली.
दादाला
काही पत्त्यांचा खेळ माहित नव्हता. समोरच्या अप्परला सांडलेला तेलुगू पिच्चरवाला
भाऊ तर काही केल्या खाली येईना.
मग
काय, २ कॅट बाहेर आले, एकावर एक बॅग ठेऊन टेबल मांडण्यात आलं.
जोकराविना
रमी खेळत सागरने २ डाव गिळले, मग प्रत्येकी एक-एक डाव जिंकत रमीला रामराम ठोकायचं
ठरलं.
मग
खो आला बदाम ७ वर. च्यामायला इथे भी बदाम ७ च, आणि त्यात परत राजे हातात. आंटींना
खेळ समजूपर्यंत डेमोडाव झाला. मग सागर, मी, आंटी, दिदी, दादा असे ५ जण खेळणार
म्हणल्यावर दिदीनं भारी प्रकार केला. २ कॅट घेऊन बदाम ७ खेळायचं! म्हणजे तुझा राजा
सुटायला तू धडपड केली आणि नेमका तुझ्याआधी एखाद्याचा राजा सुटला कि त्याला उचक्या
आल्याच म्हणून समजा!
तिथं
पण य प्रकारे आडवा-आडवी करत सागरनं २ डाव जिंकले. एव्हाना बाजूच्या साईड-लोवरवाल्या
काकूंना पण खेळ पाहण्यात रस आला. "हमारे यहाँ ये खेल नहीं खेलता कोई!"
मग
काय खेळायचं असा प्रश्न आला आणि मी चॅलेंज खेळायचं सुचवलं. ज्यांना खेळ माहीत होता
त्यांच्या डोळ्यात चमक! दादाला खेळ समजवला, आंटी, "हमारे यहाँ इसे ब्लफ
केहतें हैं, आप खेलो में बस देखुंगी"
No
points for guessing, सागर सगळ्यात आधी सुटला. मग खेळात थोडी मजा म्हणून मी उगाच
चॅलेंज करायला सुरु केलं. त्यात माझ्या "२ गुलाम" आणि "उपर
एक" ने जो काही हैदोस मांडला कि सांगायची सोय नाही. बहुदा आमचा गोंगाट ऐकून
बाजूच्या कुपेतलं पाखरू आलं. "मुझे भी खेलना है!" तिच्या आईबरोबर पत्ते
खेळायची संधी नाकारून पाखरू वर म्हणालं, "मुझे इनके साथ खेलना है!"
पाखराला
माझ्या आणि आंटींच्यामध्ये कसंबसं बसवलं. पानं बघत-लपवत-दाखवत खेळ सुरु झाला. परत
सागर सुटला. पाखराचे सगळे पत्ते चॅलेंज करायची सोय होती मला, पण स्पोर्टींग नेचर
म्हणून मी पाखराला जिंकवलं. सागर जरा लैच सहज सूटतोय म्हणून मी जागा बदलली. तरी
सुटायचा ते त्यो सुटलाच! मग शेवटी पाखरू आणि मी राहिलो. "मेरे चार इक्के,
उसपे चार" करत म्या डाव जिंकलो, आणि पँट्रीवाला जेवण घेऊन आला.
पत्त्याचा
पत्ता कट झाला होता आणि जेवून पिच्चर बघायचा प्लॅन चालत नाही म्हणल्यावर गप पडी
मारायचं ठरलं.
सकाळी
जाग आली तेव्हा खिडकीतून बाहेर दिल्लीच्या outskirts चा देखावा होता. जांभयाचं
प्रकरण उरकेपर्यंत दिल्ली आलं.
सामान
काढून बाहेर येईपर्यंत कुपेतले सहप्रवासी गर्दीत हरवले. सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे,
राईस आणि कर्ड शेअर करणारा बिनतोड तेलुगू पिच्चर पाहणारा भाऊ, आजवर पत्ते न
खेळणारा दादा, त्याला आणि आम्हाला पत्ते खेळायला भाग पाडणारी दिदी, 'Home is where
your Mom is!' असं पुन्हा गिरवून सांगणाऱ्या आंटींजी, ह्यापालिकडे आम्हाला
एकमेकांची नावं पण माहित नाहीत, आणि ते विचारायची तसदी पण कुणी घेतली नाही.
Time and again I was lucky enough to say, a
long travel had turned into a nice journey.
No comments:
Post a Comment