मागच्या उन्हाळ्यात मावळातले
खूप ट्रेक झाले होते. ह्या वेळेस मुंबईत असल्याने उन्हाळा जास्त जाणवणार होता. प्रचंड
उकाडा असला तरी आंबट-गोड आंबे आणि इतर रानमेवा खायचा मोह काही आवरेना. आता मुंबईजवळ
आंब्यासाठी वन-डे काही करायचं म्हणलं की सर्वात आधी भीमाशंकरचा नंबर लागतो. खुद्द भीमशंकरला
जाण्यात मला काही विशेष रस नसल्याने पुन्हा त्या आसपासच्या २ घाटवाटा उरकणं भाग होतं.
२ दिवस नकाशे गिरवून २ घाटवाटांची
शिवण करायचं ठरलं. उन्हाळा असल्याने जास्त कुणी ट्रेकला जात नाही, येतो म्हणाणारे येत
नाहीत आणि जाणारे सांगत नाहीत. मीही काही जास्त विचारपूस केली नाही, बहुतेकांचा नकार
साहजिक होता. कसंय ना 'माहीत असताना पंधरा दिवस वापरलेल्या मोज्याला "वास येतोय
का?" असा प्रश्न विचारु नये, विचारलाच तर वास घेऊ नये, वास घेतलाच तर तिथं थांबून
काशी करू नये.' दुधाची तहान ताकावर भागवायला लागू नये म्हणून सोलोचा प्लॅन आखला.
हौशी गडी - यतिनशी चर्चा
करुन खेतोबा घाट आणि कौल्याच्या धारेचा प्लॅन फायनल केला. शनिवारी ऑफिसमध्ये नसलेलं
काम संपवून वेळेत घर गाठलं. (ह्या ब्लॉगमध्ये म्यानिजरच्या नावानं खडे फोडले नाहियेत
हो). मेडिकीट, टॉर्च, अर्धा डझन केळी, ३ संत्री, १ लिटर ताक, १ चिक्कीचा छोटा तोटा,
२० पारलेच्या गोळ्या, ५ लिटर पाणी घेऊन मी बाईक वर निघालो.
प्लॅन असा होता की बाईक आंबिवलीत
ठेवायची.. मुंबईकरांनो हे आंबिवली शहाडजवळचं आंबिवली नव्हे. असेही महाभाग असतात. एकदा
प्रितीनं एक किस्सा सांगितला होता, त्यात ती रसाळ-सुमार-महिपतजवळच्या वडगावबद्दल सांगत
होती, एक भरकटलेला पुणेरी नग बिनधास्त विचारून गेला, "वडगाव शेरी की वडगाव बुद्रुक?"
आता करं जोडण्याव्यतिरिक्त काय करावं कळेना. बर, प्लॅन असा होता की आंबिवलीत बाईक ठेवून
जमरुंगच्या कामतपाड्याला ११ नंबरच्या बसने जायचं. शिडीनं मधल्या पदरात जायचं, तिथून
खेतोबा घाट चढायचा, पुढं भूताच्या माळानं पदऱ्याच्या वाडीकडे यायचं, गावाकडे न उतरता
उजवीकडे नाखिंडीकडे यायचं, नाखिंड किंवा कौल्याच्या धारेनं खाली पेठाच्या वाडीत यायचं,
तिथनं आंबिवली. लांबलचक पण सोपा प्लॅन. कर्जतजवळ जायचं असल्याने विशेष अंतर नव्हतं.
कडावजवळ रस्त्यात काहीतरी गुंडाळी करून बसलं होतं. पटकन गाडी थांबवाली, टॉर्च काढला
आणि नीट पाहिलं. २ घोणस. पहिल्याच बॉलवर चौका! मागच्या मिनीबसला थांबवलं समोरच्या २
बाईक वाल्यांना थांबवलं आणि काठीनं ढकलत-ढकलत दोन्ही महाशयांना रस्त्यावरुन सरकावलं
आणि प्रवास पुढे सुरु झाला.
आंबिवलीत पोहोचलो तेव्हा
२ वाजले होते. एका हॉटेलापाशी गाडी ठेवली आणि त्या दादाला सांगितलं की मी जातोय, उद्या
येईन. जमरुंगात कुणा एका रेतीवाल्याचं लगिन असल्याचं त्यानं सांगितलं तसं मी तिथंच
खाट धरली, उगाच रेतीवाल्याच्या अन् रिक्षावाल्याच्या नादात (?!) कामावर जायला उशीर
व्ह्यायचा. 'करायचंय ते कर पण मला झोपू दे' अशा काहिशा आविर्भावात त्यानं लाईटीच्या
बटणाला काठी मारून बंद केलं. सकाळी कसायाच्या आवारातल्या कोंबड्यानं त्याच्या यमाला
आवाज दिला. प्रातःविधी उरकून निघूपर्यंत त्यानं कोंबड्याचं तोरण लावलं होतं.
आंबिवली ते जमरुंग अंदाजे
४ किमी आणि पुढे कामतपाडा २ किमी अशी मॉर्निंग परेड होणार होती, झाली. कामतपाड्यात
वाजंत्रीनं जाऊ की शिडीनं जाऊ ते विचारून घेतलं. गावातल्या थोरल्यांनी शिडी, वाजंत्री
आणि नाखिंड अशा सगळ्या वाटा दाखवून दिल्या, आणि वाटा चुकणाऱ्यातला असशील तर शिडीनं
जा, वाटेवर असून उगाच धडपडणारा असशील तर वाजंत्रीनं जा असा सल्ला दिला. दोन्ही नॉट
ऍप्लीकेबल म्हणून मी आपला शिडीकडे निघालो. समोर दिसणाऱ्या जामरुंगच्या डिग्ग्याकडे
बघत त्या अलिकडची सोंड चढलो. मग लागलेल्या कुरणातून ला डावीकडून वळसा घालत मागं पोहोचलो.
आता कारवीतून वाट जराशी उजवीकडे पदरावर चढू लागली. तिथं धापा टाकून जिभ बाहेर येवून
पार कुत्रा झाला. पारलेची गोळी जिभेवर ठेवून पुन्हा चढाई सुरु केली. चघळून गोळी चकोट
होण्याआधीच पहिली शिडी लागली. ती चढून मग डावीकडे हातभर ट्रॅवेर्स करून पुढे वर चढलो.
अजुन एक शिडी, पहिल्यापेक्षा लहान आणि विचित्र. ती चढून गेलो की ३० फुट स्क्र्अँबल
केलं आणि पठरावर पोहोचलो. तिथं पठारावर आधी वस्ती होती, आता नाहीये. उत्पन्नाचे पर्यायी
मार्ग गवसल्यानं हल्ली एकतर पदरावरच्या वस्त्या विस्थापित होत आहेत नाहीतर त्याचा
'निवांत'पणा नाहिसा होताना दिसत आहे, आणि त्यात वावगं वाटण्यासारखं काही नाही, आणि
त्या लोकांची चूक मुळीच नाही. प्रगती आणि सोई कुणाला नको आहेत? आपण आज कितीही हौशीनं
एखाद्या पदऱ्याच्या वस्तीत एक रात्र मुक्कामी राहिलो तरी उद्या फोटो फेसबुकवर टाकायला
आणि मला हा ब्लॉग पोस्ट करायला खाली यावसं वाटेलच की.
अगदी ह्याच विचारात वस्तीच्या
पडक्या चौकटीचे फोटो काढून मी पुढे निघालो. खेतोबा उतरून आलेली पायवाट वस्तीपाशी आली
असणार म्हणून मळलेल्या वाटेनं जाऊ असा विचार केला. जमरुंगच्या दिशेला पाठ करून वस्तीकडे
पाहिलं असता वाट थोडी उजवीकडून जाते असा मला अंदाज होता, अगदी तसंच करून मी मधल्या
जंगलात शिरलो. पाचच मिनिटांत समोरनं एक वाट आली आणि डावीकडे एक वाट वळाली. टुना-टुना
उड्या मारत मी डावीकडे चढायला सुरु केलं. ५ मिनिटं वर आल्यावर खेतोबाला खेटून असलेला
कडा दिसला आणि मागे पाहिलं असता वाजंत्री जिथं वर येते ती जागा दिसली. वाट योग्य असल्याची
खात्री झाली. यतिननं सांगितलं होतं ते अगदी तंतोतंत जुळलं होतं. वाह रे गड्या!
जसजसा वर चढत होतो, उजवीकडे
कडा जवळ येत होता, तसतशी हवा गार झाली, पायाखाली आधी माती, मग गोटे आणि मग धोंडे आले.
कडा बाजूला आल्यावर वाट सोडून कड्याजवळ जाण्याचा मोह काही आवरला नाही. माकडं नसल्याची
खात्री करून कड्याच्या पोटाशी बसकण मारली. पहिलाच ब्रेक असल्यानं पाण्यापाठोपाठ एक
केळं पोटात ढकलून दिलं. पटापट वर आल्यानं घाई नव्हती, त्यात आत्ताशी कुठे
९ वाजले होते. मग निवांत बसलोच होतो तर एक गाणं ऐकून घेतलं.
How many years can a mountain exist,
एकच गाणं ऐकलं आणि पुन्हा हेडफोन गुंडाळून आत ठेवून दिले, सिपरमधून पाण्याचे २ घोट ओढले आणि चढाई सुरु केली. वाट मळलेली आणि सावलीत असल्याने चढायला विशेष त्रास होत नव्हता. त्यात ऊन वाढायच्या आत मी पठारावर आल्यानं दमट हवा नव्हती. उन्हात दमट हवेत मोठे घाट चढताना जो काही छळ होतो ते सांगायची गरजच नाही.
घाट पाहता क्षणीच भयंकर आवडला होता. सणसणीत कडा आणि त्या कड्याला लागून एक हलकीशी धार. त्या धारेवर ही वाट. सह्याद्रीत असे अनेक अजब-गजब प्रकार केलेत. ज्यानं वाट काढली असेल त्याला कोपऱ्यातनं नमस्कार.
घाट चढून माथ्यावर पोहोचलो तेव्हा ९.३० वाजले होते. समोर जंगल आणि डावीकडे कड्यापाशीच खेतोबाचं मंदिर. नास्तिक असलो तरीही मला अशी ही डोंगरदऱ्यातली मंदिरं पाहत राहाविशी वाटतात, ह्यांना व्यावसायिकतेचा गंध नसतो अजिबात. नशीबाने येळवलीचे (येरवळ) बाणेरे आजोबा आपल्या २ नातवांना घेऊन तिथं आले होते. एकटाच असल्यानं त्यांनी जरा करड्या शब्दातच उजळणी घेतली, पण नंतर खंडू दादांची ओळख सांगितल्यावर त्यांनी लागलीच त्यांच्या जवळचा देवाला फोडलेला नारळ खायला दिला. मी ही त्यांच्या नातवांना गोळ्या देऊन आपलंसं केलं की स्वारी खुश.
आजोबा: "आता मी वाट दाखिवतो तिथंनं सरल जायचं, वाडीत नगं जाऊस, पंचक्कीला उजवीकडं जायाचं आणि नढ्यानं खाली उतरायचं."
मी: "मग ती नाखिंडीची वाट झाली की."
आजोबा: "तुला आंबे खायचेत नव्हं, त्ये कौल्याला न्हाईत. कौल्याला लै ऊन आता, झाडं भी न्हाईत."
आजोबांचं म्हणणं खरं होतं. कौल्याच्या धारेनं उतरताना गुढघ्याच्या वाट्या करकरल्या असत्या, त्यापेक्षा नाखिंडीची वाट कधीही सोयीची होती. दोन्ही वाटा तसंही एकाच पदरात येतात.
साधारण १०.३० वाजता आजोबांसोबतच निघालो आणि सावळे-भीमाशंकर वाटेवर मी उजवीकडे वळालो, आजोबा येळवलीकडे निघुन गेले.
इथून थेट लोणावळापर्यंतचा प्रदेश मी य वेळा भटकल्यानं ठरवून सुद्धा हरवणं अशक्य होतं. त्यामुळे फक्त नजर भिरकवत चालणे हा एकच उद्योग होता, त्यात मला पठारांवर भटकायला प्रचंड आवडतं. हातातली काठी दामटवत डिजेल इंजिन जे निघालं, ते मधल्या कड्याशी एकदा डोकावून, भरपेट करवंदं खात बरोबर दीड तासात म्हणजे १२ ला नेढ्या समोरच्या झाडाखाली जाऊन थांबलं. त्याआधी त्या कच्च्या रस्त्याच्या अलीकडे जे काही बांधकाम चालू आहे ते पाहिलं. दर खेपेला पाहतोय ते वाढतच जातंय. तिथे एक इसम भेटला. त्याला विचारलं की हा नेमका प्रकार काय आहे, तर त्यानं खुलासा केला की फॉरेस्ट डिपार्टमेंटचा हा तुकडा बळकावून तिथं आता कोणतं तरी मंदिर होत आहे. जुन्या मंदिराचा जिर्णोद्धार करत आहेत की डायरेक्ट नवा गडी नव राज्य चालू आहे माहीत नाही. तसंही तिथली परिस्थिती हाताबहेर गेल्यात जमा आहे. विंडमिल्ससाठी रस्ता, आणि आता तर कुसूर जवळून तो कर्जत-भीमशंकर रस्ता थेट जंगल फाडत जाणार आहे. म्हणजे नंतर इथं न फिरकलेलं बरं. खेदजनक असलं तरी डेवलपमेंटच्या नावाखाली खपतंय ह्याला आपण काही करू शकत नाही.
थॅंक्स टू द डेवलपमेंट, घोटाभर मातीतून थपथप माती उडवत उन्हात चालत यावं लागलं. बूट लाल झाले होते. आता ऊन चांगलंच जाणवत होतं. निवांत जागा होती म्हणून तिथंच जेवण उरकायचा मानस होता, पण वारा पडलेला असल्यानं मी मागल्या बाजूस जाऊन जेवायचं ठरवलं.
जरा नीट न्याहाळलं आणि गावाकडून वर आलेली वाट दिसली. २ च मिनिटांत ती वाट रस्ता सोडून उजवीकडे कारवीत शिरली. त्या वाटेनं नेढ्याच्या मागे जाणं शक्य होतं. तिथं जरा पुढे गेलो आणि एक वाट उजवीकडे कारवीत उतरली. ती वाट नाखिंडीची नाही हे मला नक्की माहीत होतं. तिच्यावर फक्त एकदा नजर टाकली आणि वाटेला लागलो. थोडं पुढे डावीकडे आलो, उजवीकडे दरी, त्या पल्याड कोथळीगड आणि डावीकडे नेढं. तसाच पुढे चालत आलो, उजवीकडे कड्याशी डोकावलं, खाली पाण्याचं टाकं! थोडा वळसा टाकून केकताड्याच्या बाजूनं टाक्यापाशी पोहोचलो. गार पाणी! आधी पाण्यानं पोटाचा टँकर भरला आणि ५ मिनिट तिथंच बसून राहिलो. टाक्यापासून पुढे वाट उतरत नव्हती. मग परत वर आलो, सावली हेरली आणि बसलो.
खाली कोथळीगडावर लोकांचं आगळंच ऍडवेंचर चालू होतं. त्यांची बोंबाबोंब आणि एका ए-ओ कॉलला आपल्या-परक्या १०० जणांचा रिप्लाय म्हणजे त्या ऍडवेंचरचाच एक भाग. केळी आणि संत्री खाऊन पोटोबा शांत केला आणि सोबत ३ लीटर पाणी असल्याची खात्री करून नाखिंडीच्या वाटेची सुरुवात पाहून घेतली. पण मग आलोच आहोत तर कौल्याच्या तोंडाशी जाऊन येऊ म्हणून तसाच पुढे गेलो. अगदी ५-७ मिनिटाच्या चालीवर कौल्याच्या धारेची सुरुवात होती. ती पाहिली आणि पुन्हा नाखिंडीच्या वाटेशी आलो. पायपीट बरीच झाली असली तरी अजुन निम्मा ट्रेक बाकी आहे ह्या विचारांती नाखिंडीची वाट उतरायला सुरुवात केली तेव्हा १.३० वाजले होते.
वाटेत सुरुवातीला थोडा तीव्र उतार आणि मग एका छोट्या कातळाच्या बाजूला आलो, वाट डावीकडे वळते तिथं उजवीकडे छोटी नैसर्गिक (?) गुहा दिसली. मध्ये थोडी पडझड झाली असल्यानं आणि मुळात मला आळस आला असल्यानं मी काही तिथं गेलो नाही. आज रिग्रेट करतोय की तेव्हाच पाहायला हवं होतं जाऊन. असो, तर मी तसाच खाली उतरत गेलो आणि मधल्या पट्टयात अचानक एका जागी येऊन थबकलो. नजर जाईल तिथे आंबे पडले होते. जवळपास अर्धा तास मी काही तिथून हललो नाही. GPS ट्रॅकवर उगा कुरडया येऊ नयेत म्हणून सॅक आणि मोबाईल झाडाखाली ठेवले. घरी नेण्यासाठी पण पिशवी भरेस्तोवर आंबे आणि कैऱ्या भरल्या आणि मग ओझं घेऊन निघालो. तरी रानमेव्यावर ताव मारणं चालूच होतं.
ही घाटवाट तशी बऱ्यापैकी वापरात असल्यानं मळलेली आहे, हरवण्याची शक्यता कमीच. डाव्या बाजूला एक सोंड सोडून पलीकडे कौल्याची धार उतरत होती.
साधारणतः २.१५ ला मी कोथळी गडाच्या पदरात उतरलो. खाली येताच एक वाट उजवीकडे उतरली, जी कामतपाड्यात जात असावी. आजून २ मिनिटं चाललो आणि कौल्याच्या धारेची वाट येऊन मिळाली. तसंच पुढे चालत पेठच्या पोटाशी जी वाडी आहे तिथं आलो.
कोथळीगडावर त्या उन्हात अन् मुळात गर्दीत जाण्याइतपत माझी हिंमतच नव्हती. उगाच उभ्या उंटिणीचा मुका घ्यायला मी वेडा नाही, म्हणून मी गपगुमान आंबि वलीची वाट धरली. वाटेवर मधल्या खिंडीशी एक दादा भेटला, त्यानं गप्पा मारता-मारता त्या भागातल्या अनेक गजब वाटा सांगितल्या. एका संत्रीत तो आपला दोस्त झाला. तसंही 'संत्र्या'चं नातं पटकन जुळतं. त्याच्याशीच गप्पा मारत पाऊण तासात आंबिवलीत पोहोचलो तेव्हा ३.३० वाजले होते. गाडी काढून घरी पोहोचलो तेव्हा ५ वाजले होते, ट्रेक वेळेत झाल्याने सोसायटीत बॉक्सच्या ४ मॅच खेळणं शक्य झालं.
How many years can a mountain exist,
Before it is washed to the sea?
Yes, and how many years can some people exist,
Before they're allowed to be free?
Yes, and how many times can a man turn his
head,
And pretend that he just doesn't see?
The answer, my friend, is blowin' in the wind,
The
answer is blowin' in the wind.
Yes, and how many times must a man look up,
Before he can see the sky?
Yes, and how many ears must one man have,
Before he can hear people cry?
Yes, and how many deaths will it take 'til he
knows,
That too many people have died?
The answer, my friend, is blowin' in the wind,
The
answer is blowin' in the wind.
Lyrics: Bob Dylan, Singer: Bob
Dylan, Album: The Freewheelin' Bob Dylan (1963)
एकच गाणं ऐकलं आणि पुन्हा हेडफोन गुंडाळून आत ठेवून दिले, सिपरमधून पाण्याचे २ घोट ओढले आणि चढाई सुरु केली. वाट मळलेली आणि सावलीत असल्याने चढायला विशेष त्रास होत नव्हता. त्यात ऊन वाढायच्या आत मी पठारावर आल्यानं दमट हवा नव्हती. उन्हात दमट हवेत मोठे घाट चढताना जो काही छळ होतो ते सांगायची गरजच नाही.
घाट पाहता क्षणीच भयंकर आवडला होता. सणसणीत कडा आणि त्या कड्याला लागून एक हलकीशी धार. त्या धारेवर ही वाट. सह्याद्रीत असे अनेक अजब-गजब प्रकार केलेत. ज्यानं वाट काढली असेल त्याला कोपऱ्यातनं नमस्कार.
घाट चढून माथ्यावर पोहोचलो तेव्हा ९.३० वाजले होते. समोर जंगल आणि डावीकडे कड्यापाशीच खेतोबाचं मंदिर. नास्तिक असलो तरीही मला अशी ही डोंगरदऱ्यातली मंदिरं पाहत राहाविशी वाटतात, ह्यांना व्यावसायिकतेचा गंध नसतो अजिबात. नशीबाने येळवलीचे (येरवळ) बाणेरे आजोबा आपल्या २ नातवांना घेऊन तिथं आले होते. एकटाच असल्यानं त्यांनी जरा करड्या शब्दातच उजळणी घेतली, पण नंतर खंडू दादांची ओळख सांगितल्यावर त्यांनी लागलीच त्यांच्या जवळचा देवाला फोडलेला नारळ खायला दिला. मी ही त्यांच्या नातवांना गोळ्या देऊन आपलंसं केलं की स्वारी खुश.
आजोबा: "आता मी वाट दाखिवतो तिथंनं सरल जायचं, वाडीत नगं जाऊस, पंचक्कीला उजवीकडं जायाचं आणि नढ्यानं खाली उतरायचं."
मी: "मग ती नाखिंडीची वाट झाली की."
आजोबा: "तुला आंबे खायचेत नव्हं, त्ये कौल्याला न्हाईत. कौल्याला लै ऊन आता, झाडं भी न्हाईत."
आजोबांचं म्हणणं खरं होतं. कौल्याच्या धारेनं उतरताना गुढघ्याच्या वाट्या करकरल्या असत्या, त्यापेक्षा नाखिंडीची वाट कधीही सोयीची होती. दोन्ही वाटा तसंही एकाच पदरात येतात.
साधारण १०.३० वाजता आजोबांसोबतच निघालो आणि सावळे-भीमाशंकर वाटेवर मी उजवीकडे वळालो, आजोबा येळवलीकडे निघुन गेले.
इथून थेट लोणावळापर्यंतचा प्रदेश मी य वेळा भटकल्यानं ठरवून सुद्धा हरवणं अशक्य होतं. त्यामुळे फक्त नजर भिरकवत चालणे हा एकच उद्योग होता, त्यात मला पठारांवर भटकायला प्रचंड आवडतं. हातातली काठी दामटवत डिजेल इंजिन जे निघालं, ते मधल्या कड्याशी एकदा डोकावून, भरपेट करवंदं खात बरोबर दीड तासात म्हणजे १२ ला नेढ्या समोरच्या झाडाखाली जाऊन थांबलं. त्याआधी त्या कच्च्या रस्त्याच्या अलीकडे जे काही बांधकाम चालू आहे ते पाहिलं. दर खेपेला पाहतोय ते वाढतच जातंय. तिथे एक इसम भेटला. त्याला विचारलं की हा नेमका प्रकार काय आहे, तर त्यानं खुलासा केला की फॉरेस्ट डिपार्टमेंटचा हा तुकडा बळकावून तिथं आता कोणतं तरी मंदिर होत आहे. जुन्या मंदिराचा जिर्णोद्धार करत आहेत की डायरेक्ट नवा गडी नव राज्य चालू आहे माहीत नाही. तसंही तिथली परिस्थिती हाताबहेर गेल्यात जमा आहे. विंडमिल्ससाठी रस्ता, आणि आता तर कुसूर जवळून तो कर्जत-भीमशंकर रस्ता थेट जंगल फाडत जाणार आहे. म्हणजे नंतर इथं न फिरकलेलं बरं. खेदजनक असलं तरी डेवलपमेंटच्या नावाखाली खपतंय ह्याला आपण काही करू शकत नाही.
थॅंक्स टू द डेवलपमेंट, घोटाभर मातीतून थपथप माती उडवत उन्हात चालत यावं लागलं. बूट लाल झाले होते. आता ऊन चांगलंच जाणवत होतं. निवांत जागा होती म्हणून तिथंच जेवण उरकायचा मानस होता, पण वारा पडलेला असल्यानं मी मागल्या बाजूस जाऊन जेवायचं ठरवलं.
जरा नीट न्याहाळलं आणि गावाकडून वर आलेली वाट दिसली. २ च मिनिटांत ती वाट रस्ता सोडून उजवीकडे कारवीत शिरली. त्या वाटेनं नेढ्याच्या मागे जाणं शक्य होतं. तिथं जरा पुढे गेलो आणि एक वाट उजवीकडे कारवीत उतरली. ती वाट नाखिंडीची नाही हे मला नक्की माहीत होतं. तिच्यावर फक्त एकदा नजर टाकली आणि वाटेला लागलो. थोडं पुढे डावीकडे आलो, उजवीकडे दरी, त्या पल्याड कोथळीगड आणि डावीकडे नेढं. तसाच पुढे चालत आलो, उजवीकडे कड्याशी डोकावलं, खाली पाण्याचं टाकं! थोडा वळसा टाकून केकताड्याच्या बाजूनं टाक्यापाशी पोहोचलो. गार पाणी! आधी पाण्यानं पोटाचा टँकर भरला आणि ५ मिनिट तिथंच बसून राहिलो. टाक्यापासून पुढे वाट उतरत नव्हती. मग परत वर आलो, सावली हेरली आणि बसलो.
खाली कोथळीगडावर लोकांचं आगळंच ऍडवेंचर चालू होतं. त्यांची बोंबाबोंब आणि एका ए-ओ कॉलला आपल्या-परक्या १०० जणांचा रिप्लाय म्हणजे त्या ऍडवेंचरचाच एक भाग. केळी आणि संत्री खाऊन पोटोबा शांत केला आणि सोबत ३ लीटर पाणी असल्याची खात्री करून नाखिंडीच्या वाटेची सुरुवात पाहून घेतली. पण मग आलोच आहोत तर कौल्याच्या तोंडाशी जाऊन येऊ म्हणून तसाच पुढे गेलो. अगदी ५-७ मिनिटाच्या चालीवर कौल्याच्या धारेची सुरुवात होती. ती पाहिली आणि पुन्हा नाखिंडीच्या वाटेशी आलो. पायपीट बरीच झाली असली तरी अजुन निम्मा ट्रेक बाकी आहे ह्या विचारांती नाखिंडीची वाट उतरायला सुरुवात केली तेव्हा १.३० वाजले होते.
वाटेत सुरुवातीला थोडा तीव्र उतार आणि मग एका छोट्या कातळाच्या बाजूला आलो, वाट डावीकडे वळते तिथं उजवीकडे छोटी नैसर्गिक (?) गुहा दिसली. मध्ये थोडी पडझड झाली असल्यानं आणि मुळात मला आळस आला असल्यानं मी काही तिथं गेलो नाही. आज रिग्रेट करतोय की तेव्हाच पाहायला हवं होतं जाऊन. असो, तर मी तसाच खाली उतरत गेलो आणि मधल्या पट्टयात अचानक एका जागी येऊन थबकलो. नजर जाईल तिथे आंबे पडले होते. जवळपास अर्धा तास मी काही तिथून हललो नाही. GPS ट्रॅकवर उगा कुरडया येऊ नयेत म्हणून सॅक आणि मोबाईल झाडाखाली ठेवले. घरी नेण्यासाठी पण पिशवी भरेस्तोवर आंबे आणि कैऱ्या भरल्या आणि मग ओझं घेऊन निघालो. तरी रानमेव्यावर ताव मारणं चालूच होतं.
ही घाटवाट तशी बऱ्यापैकी वापरात असल्यानं मळलेली आहे, हरवण्याची शक्यता कमीच. डाव्या बाजूला एक सोंड सोडून पलीकडे कौल्याची धार उतरत होती.
साधारणतः २.१५ ला मी कोथळी गडाच्या पदरात उतरलो. खाली येताच एक वाट उजवीकडे उतरली, जी कामतपाड्यात जात असावी. आजून २ मिनिटं चाललो आणि कौल्याच्या धारेची वाट येऊन मिळाली. तसंच पुढे चालत पेठच्या पोटाशी जी वाडी आहे तिथं आलो.
कोथळीगडावर त्या उन्हात अन् मुळात गर्दीत जाण्याइतपत माझी हिंमतच नव्हती. उगाच उभ्या उंटिणीचा मुका घ्यायला मी वेडा नाही, म्हणून मी गपगुमान आंबि वलीची वाट धरली. वाटेवर मधल्या खिंडीशी एक दादा भेटला, त्यानं गप्पा मारता-मारता त्या भागातल्या अनेक गजब वाटा सांगितल्या. एका संत्रीत तो आपला दोस्त झाला. तसंही 'संत्र्या'चं नातं पटकन जुळतं. त्याच्याशीच गप्पा मारत पाऊण तासात आंबिवलीत पोहोचलो तेव्हा ३.३० वाजले होते. गाडी काढून घरी पोहोचलो तेव्हा ५ वाजले होते, ट्रेक वेळेत झाल्याने सोसायटीत बॉक्सच्या ४ मॅच खेळणं शक्य झालं.
मी हे असंख्य वेळा ऐकलं आहे कि ट्रेकिंग हे एकट्यानं नसावंच, त्रिकुट-चौकट तर असावीच. ह्या ट्रेकच ही तसं म्हणता येईल. उतरताना किंवा चढताना पडला असतास तर काय? वाटेत काही चावलं असतं तर काय? मग नेटवर्क नसतं तर काय? हे करून मिळालं तरी काय? आणि असंख्य तत्सम प्रश्न. खरं सांगायचं झालं तरं हे प्रश्न काहींना हा ब्लॉग वाचल्यावर पडू शकतात, फरक एवढाच आहे कि हे प्रश्न मला ट्रेक सुरु करायच्या आधी पडतात, आणि होय, तरीही मी जातो.
'का?' ह्या प्रश्नाची बरीच उत्तरं आहेत.
'नाही गेलास तर नाही का चालणार?' ह्याचं एकचं उत्तर : नाही चालणार!
'पुन्हा जाशील का?' ह्याचं उत्तर माझ्याकडं पण नाही.
हं, माझ्या सोलो ट्रेक बद्दल तुम्हाला काही आक्षेप असेल तर तसं सौम्य आणि तुम्हालाच शोभेल अश्या शब्दात वैयक्तिक संदेशाद्वारे सांगा, चर्चा करू. उद्धटपणे व्यक्त केलेल्या मताला किंवा टीकेला मधले बोट किंवा आरसा दाखवण्यात येईल.
I do not intend to motivate/discourage anyone from trekking/solo-trekking. I believe this and every other trek has taught me a handful of things. I simply don't expect anyone to pack his/her sack and set off to a solo trek after reading this or any of my blogs.